माहीमच्या सेंट झेवियर्समध्ये 'मुन्ना भाई', १३ वर्षापासून बनावट डिग्रीवर विद्यार्थ्यांना धडे...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 09:08 AM2020-07-27T09:08:11+5:302020-07-27T09:08:28+5:30

बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून, अधिक तपास सुरु आहे.

'Munna Bhai' at St. Xavier's in Mahim, lessons for students on fake degrees from 13 years ... | माहीमच्या सेंट झेवियर्समध्ये 'मुन्ना भाई', १३ वर्षापासून बनावट डिग्रीवर विद्यार्थ्यांना धडे...

माहीमच्या सेंट झेवियर्समध्ये 'मुन्ना भाई', १३ वर्षापासून बनावट डिग्रीवर विद्यार्थ्यांना धडे...

Next

- मनीषा म्हात्रे 

मुंबई - मुन्ना भाई एमबीबीएस चित्रपटाप्रमाणे माहीममधील एका नामांकित इंस्टीट्यूटमध्ये एका शिक्षकाने तब्बल १३ वर्षापासून बनावट डिग्रीच्या आधारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धड़े दिल्याचा प्रताप समोर आला आहे. माहीमच्या सेंट झेविअर्स टेक्निकल इन्स्टिटयुटमध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

 मनीष केवलचंद खोब्रागड़े असे प्रतापी  शिक्षकाचे नाव आहे. ८ मार्च २००६ पासून तो माहिमच्या सेंट झेविअर्स टेक्निकल इन्स्टिटयुटमध्ये अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहे. ज्यावेळी त्यांची नियुक्ती झाली त्यावेळचे प्राचार्य, प्रबंधक, कार्यालयीन अधिक्षक सेवा निवृत्त झालेले आहेत. मुलाखती दरम्यान त्याने बॅचलर आणि इंजीनियरिंगमध्ये (बीई) पदवी घेतल्याचे नमूद केले होते. धक्कादायक बाब म्हणजे निवड झाली तेव्हा देखील त्याने खरी शैक्षणिक कागदपत्रे सबमीट केली नाही.  

 यातच खोब्रागड़ेने प्रमोशनसाठी अर्ज केला. या अर्जावरुन इन्स्टिटयुटचे प्राचार्य डाँ शिवाजी बापुराव घुंगराड यांनी त्याचा प्रगती अहवाल तपासण्यास सुरुवात केली. त्यात १३ वर्षाच्या  कार्यकाळामध्ये ३४० दिवस बिनपगारी रजा झाल्याने त्यांना संशय आला. त्यांनी त्याच्याकडे  शिक्षणाबाबतचे मुळ कागदपत्र मागविण्यास सुरुवात केली. त्यावेळीही कौटुंबिक कारण, आजारपणाचे कारण व असाधारण रजा मंजूर करून वेळ मारून नेली. 

 कागदपत्रे जमा न केल्यास पोलिसांत तक्रार देण्यात येईल अशी धमकी संस्थेकडून देण्यात येताच १९ नोव्हेबर २०१८ रोजी त्याने कागदपत्रे जमा केली. त्यामध्ये बी.ई च्या ११ गुणपत्रिका आणून दिल्या. त्या  सर्व गुणपत्रिका स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदयापीठ नांदेड (SRTMU) यांच्याकडे चौकशीसाठी पाठवताच ते बनावट असल्याचे उघड़ झाले. १७ डिसेम्बर रोजी याबाबतचा अहवाल प्राप्त होताच संस्थेला धक्का बसला. त्याला जून पर्यंत त्याची बाजू आणि लेखी खुलासा करण्याची मुभा दिली. मात्र सहा महिन्यापासून तो रजेवर आहे. अखेर, संस्थेने माहीम पोलीस ठाणे गाठून तक्रार आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

१३ जणांमधून निवड  होते. त्यातून  तत्कालीन प्राचार्य गुर्जर, संस्थेचे संचालक फादर रेजी, शासनाचे प्रतिनिधी विभागीय कार्यालयाचे सहसंचालक दयानंद मेश्राम, विषय तज्ञ डाँ बी.के. लांडे, बी.सी. ;(बॅकवर्ड क्लास)  प्रतिनिधी  फुलमाळी उपस्थित होते. निवड समितीच्या शिफारशीनुसार  खोब्रागडे याची निवड झाली.

असाही घोळ

खोब्रागडेने दिलेल्या गुणपत्रिकेनुसार १० आँगस्ट २००२ रोजी त्याने पदवी पूर्ण केली. तसेच मुलाखतीच्या दिवशी १२ आँगस्ट २००५ दरम्यान तीन वर्षाचा कालावधी गेलेला आहे. त्यामुळे नोकरीचा अनुभव खोटा आहे. कारण त्याने सहा वर्षे १ महिन्याचा अनुभव दिलेला होता.

पितळ उघड़ होण्यापूर्वी प्राचार्यविरुद्ध षडयंत्र 

खोब्रागडेचा कामाचा आलेख बरोबर नसल्याने त्याच्यावर कारवाई होणार असल्याच्या भितीने त्याने, ५ मार्च २००८ रोजी काँलेजमधील सर्व शिक्षक अधिकारी यांना एकत्र करून प्राचार्यविरोधात लेखी तक्रार करून सदरच्या प्रकरणास वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला होता. 

चारित्र पड़ताळणी अहवालातही खाङाखोड

खोब्रागडेने नियुक्ती नंतर  जमा केलेल्या चारित्र पडताळणी प्रमाणपत्रात लात, पदवी शिक्षणाचा उल्लेख करताना खाडाखोड केलेली दिसून येत आहे. अहवालामध्ये टी ई असे नमुद केलेले आहे. त्याचे त्याने बी.ई असे केले आहे.

विद्यार्थ्यांच्या २०० तक्रारी 

खोब्रागड़े बरोबर शिकवत नाही. याबाबत विद्यार्थ्यांच्या २०० हून अधिक तक्रारी संस्थेकड़े आल्या आहेत. यात विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.

बँकानाही गंडा

खोब्रागडेने  जशी संस्थेची बनावट कागदपत्रे देवून फसवणूक केली तशीच त्यांनी ब- याच बॅंकेची फसवणुक केलेली आहे. जीवन विकास नागरी सहकारी पतपेढी (मर्यादित )वाघोली रू १,७५, ०००/-रुपये घेतल्याचेही समोर आले. तसेच  संस्थेने त्यांना दिलेले ज्ञापन याची संख्या सुध्दा ३०० एवढी आहे. 

प्रमोशनसाठी अर्ज केल्यानंतर पितळ उघड

मनीष खोब्रागड़े याने प्रमोशनसाठी अर्ज केल्यानंतर कागदपत्राची पाहणी झाली. त्यात त्याने कागदपत्र जमा केले नसल्याने त्याला नोटीस पाठविण्यात आल्या. अखेर, शैक्षणिक प्रमाणपत्र दाखल केल्यानंतर त्याची पडताळणी केली. त्यात ते बनावट असल्याचे समोर आले. यात मुलांचे नुकसान झाले आहे, शिवाय शासनाची फसवणूक केल्याने त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तसेच त्याला निलंबित करण्यात आले आहेत.

- डॉ शिवाजी बापुराव घुंगराड, प्राचार्य, सेंट झेविअर्स टेक्निकल इन्स्टिटयुट माहिम 

तपास सुरू

बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून, अधिक तपास सुरु आहे.

मिलींद गाडनकुश, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, माहीम

Web Title: 'Munna Bhai' at St. Xavier's in Mahim, lessons for students on fake degrees from 13 years ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.