हत्येप्रकरणी सौदीत दोन भारतीयांचा शिरच्छेद 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 07:18 PM2019-04-17T19:18:06+5:302019-04-17T19:23:19+5:30

शिरच्छेद झाल्यावर सौदी प्रशासनाने मात्र याबाबत काही माहिती भारत सरकारला कळवली नव्हती. 

In the murder case, two Indians were beheaded in Saudi Arabia | हत्येप्रकरणी सौदीत दोन भारतीयांचा शिरच्छेद 

हत्येप्रकरणी सौदीत दोन भारतीयांचा शिरच्छेद 

googlenewsNext
ठळक मुद्देहरजीत ,सत्विंदर आणि इमामुद्दीन या तिघांनी सौदीतील हायवेवर लुटमार केली होती. पैशांच्या वाटपावरून भांडण झाल्यामुळे त्यांनी इमामुद्दीनची हत्या केली होती. इमामुद्दीन या त्यांच्या भारतीय सहकाऱ्याची इतर दोघांनी मिळून हत्या केल्याचे समोर आले. २८ फेब्रुवारी २०१९ला त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.

चंदिगढ - आपल्याच भारतीय सहकाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी पंजाबमधील होशियारपूरच्या सत्विंदर कुमार आणि लुधियानाच्या हरजीत सिंग या दोघांचा शिरच्छेद करण्यात आला आहे. याबाबत माहिती भारतीय दुतावासाने दोघांच्याही कुटुंबीयांना दिली आहे. शिरच्छेद झाल्यावर सौदी प्रशासनाने मात्र याबाबत काही माहिती भारत सरकारला कळवली नव्हती. 

हरजीत ,सत्विंदर आणि इमामुद्दीन या तिघांनी सौदीतील हायवेवर लुटमार केली होती. पैशांच्या वाटपावरून भांडण झाल्यामुळे त्यांनी इमामुद्दीनची हत्या केली होती. काही दिवसांनंतर हरजीत सिंग आणि सत्विंदर कुमार यांना दारू पिऊन मारामारी केल्याप्रकरणी सौदी पोलिसांनी अटक केली होती. या तिघांना भारतात परत पाठवण्याची तयारी सुरु असताना इमामुद्दीन या त्यांच्या भारतीय सहकाऱ्याची इतर दोघांनी मिळून हत्या केल्याचे समोर आले. 

दोघांनाही तात्काळ रियाधला पाठविण्यात आले. त्यांच्यावर चालवण्यात आलेल्या खटल्यावर भारतीय दुतावासाचे लक्ष होते. फेब्रुवारीत त्यांना शिरच्छेदाची शिक्षा सुनावण्यात आली. २८ फेब्रुवारी २०१९ला त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. मात्र, याची माहिती भारतीय दुतावासाला देण्यात आली नाही. सत्विंदरबाबत काहीच माहिती न मिळाल्याने त्याची पत्नी सीमारानी हिने परराष्ट्र मंत्रालयात अर्ज दाखल केला. यानंतर भारतीय दुतावासाने सौदी प्रशासनाशी संपर्क साधून माहिती मिळवली, त्यावेळी दोघांना मृत्युंदंडाची शिक्षा केल्याचे उघड झाले. दोघांचेही मृतदेह मिळवण्याचा भारत सरकारने प्रयत्न केला. पण सौदी कायदा याची परवानगी देत नसल्यामुळे सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने मृतदेह भारतात पाठवण्यास नकार दिला. 

Web Title: In the murder case, two Indians were beheaded in Saudi Arabia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.