अनोळखी महिलेचा मृतदेह पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 16:38 IST2021-11-01T16:36:22+5:302021-11-01T16:38:31+5:30
Murder Case : पोलीस संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी परीसरात चौकशी करत आहेत.

अनोळखी महिलेचा मृतदेह पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ
कोल्हापूर: देवकर पानंद ते मोहिते कॉलनी या मार्गावर मोहिते मळा येथे कचर्याच्या ढिगार्यात 45 ते 50 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत मिळून आला. संबंधित मृतदेह पाच ते सहा दिवसांपूर्वी टाकला असल्याने तो सडलेल्या अवस्थेत होता. पोलीस संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी परीसरात चौकशी करत आहेत. पोलीस संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी परीसरात चौकशी करत आहेत.
सोमवारी दुपारी एकच्या सुमारास महापालिकेचे वाहन कचरा उठाव करण्यासाठी आले असता संबंधित प्रकार उघडकीस आला. कचरा उठाव कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कल्पना दिली. संबंधित महिलेचा खून करून मृतदेह गोणपाटात बांधून टाकला असण्याची शक्यता आहे. दरम्यान घटनास्थळी शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव जुना राजवाडा पोलिस स्टेशनचे पो. नि. दत्तात्रय नाळे आदींनी भेट देऊन घटनास्थळी चौकशी केली. परिसरात कोणी बेपत्ता आहे का याची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.