दारूच्या नशेत तरूणाकडून आपल्या सहकाऱ्याची हत्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 04:12 PM2020-06-21T16:12:47+5:302020-06-21T16:13:19+5:30

हणजूण पोलिसांनी खून झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

Murder of colleague by a drunken youth! | दारूच्या नशेत तरूणाकडून आपल्या सहकाऱ्याची हत्या!

दारूच्या नशेत तरूणाकडून आपल्या सहकाऱ्याची हत्या!

Next
ठळक मुद्देही घटना शनिवारी (दि.२०) रात्री ११ ते मध्यरात्री १ च्या सुमारास हडफडे येथील ‘दी पार्क’ या तारांकित हॉटेलच्या उपहारगृहात घडली.

म्हापसा : दारूच्या नशेत एका वीस वर्षीय रूम बॉयने आपला सहकारी विद्युत पर्यवेक्षकाचा झोपलेल्या स्थितीत चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. मृत्यू झालेल्या इसमाचे नाव विश्वनाथ सदाशिव गवस (२८, रा. पिकूळे, दोडामार्ग) असे आहे.

हणजूण पोलिसांनी खून झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ही घटना शनिवारी (दि.२०) रात्री ११ ते मध्यरात्री १ च्या सुमारास हडफडे येथील ‘दी पार्क’ या तारांकित हॉटेलच्या उपहारगृहात घडली. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी संशयित रामभरोसे मुन्नालाल निषाद (२०, रा. मुक्तिधाम, उत्तर प्रदेश) यास अटक केली असून त्याच्यावर भादंसंच्या ३०२ कलमान्वये गुन्हा नोंद केला.

प्राप्त माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे हे हॉटेल व्यवसाय सध्या बंद असल्याने याठिकाणी केवळ चार कर्मचारी असतात. शनिवारी हॉटेलचा पर्यवेक्षक सुमीत बुहराराम याचा वाढदिवस होता. त्यामुळे त्याने आपल्या इतर सहका-यांना वाढदिवसाची पार्टी दिली होती. यावेळी सर्व कर्मचारी हॉटेलच्या उपहारगृहात एकत्र रात्री दारू पित बसले होते. त्यानंतर मयत विश्वनाथ व संशयित रामभरोसे यांच्यात किरकोळ  वादातून भांडण झाले. दोघांमध्ये वाद वाढत चालल्याने इतर कर्मचा-यांनी या दोघांना बाजूला करू न संशयितास तेथून जाण्यास सांगितले. मात्र, थोड्या वेळानंतर आपला मोबाईल खोलीत राहिल्याने पुन्हा तो उपहारगृहात आला व त्याने भांडण उरकून काढले.

यावेळी मयताला दारूचे सेवन जास्त झाल्याने त्याला इतरांनी उपहारगृहात झोपविले. तर इतर सर्वजण लॉबीत (ओसरी) येऊन झोपले. काही वेळानंतर संशयित झोपेतून उठला व स्वयंपाक घरातून चाकू आणला आणि त्याने झोपलेल्या विश्वनाथ याच्यावर सपासप वार केले. यात मयताच्या पोटावर, छातीवर व हातावर गंभीर जखमा झाल्या व तिथेच जागीच त्याचा मृत्यू झाला. खूनीहल्ला केल्यानंतर संशयित विश्वनाथ हा पुन्हा लॉबीत येऊन झोपला व त्याने हल्ल्यासाठी वापरलेला चाकू दुसरीकडे लपविला.

काही वेळानंतर हॉटेलचा सुरक्षा रक्षक  विनय यादव हा हॉटेलमध्ये गस्त घालत असताना त्याला उपहारगृहात विश्वनाथ हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. याची माहिती नंतर हॉटेलच्या वरिष्ठांना देऊन १०८ रुग्णवाहिलेका बोलावून घेतले. त्यानंतर हणजूण पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतला. सध्या पोलिसांनी मृतदेह जतन करून ठेवला असून उद्या सोमवारी शवचिकित्सा केली जाणार आहे.
 

Web Title: Murder of colleague by a drunken youth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.