क्राइमशी संबंधित टीव्ही सिरियल्स पाहून हत्येचा रचला कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 14:14 IST2019-12-10T14:10:50+5:302019-12-10T14:14:39+5:30
७० वर्षीय महिलेच्या हत्येचे गूढ उकलले

क्राइमशी संबंधित टीव्ही सिरियल्स पाहून हत्येचा रचला कट
ठळक मुद्देसोनुबाई यांची हत्या करण्यात आल्याची कबुली दाम्पत्याने दिली. याप्रकरणी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दाम्पत्य सोमनाथ आणि नीलम वाकडे यांना अटक केली.
ठाणे - भिवंडीतील ७० वर्षीय सोनुबाई चौधरी यांच्या हत्येचे गूढ उघडण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दाम्पत्य सोमनाथ आणि नीलम वाकडे यांना अटक केली. त्यांनी घेतलेले कर्जाचे हप्ते थकले होते. दरम्यान, मयत यांच्याकडे दागिने असल्याची माहिती होती. त्यातून, ते दागिने विकून कर्ज परत करणार होते. त्यातून सोनुबाई यांची हत्या करण्यात आल्याची कबुली दाम्पत्याने दिली. तसेच हा प्रकार त्यांनी क्राईम घटनांशी संबंधित दोन टीव्हीवरील मालिक पाहून केल्याचेही कबूल केले आहे.