महिलेने मुलींना सोबत घेऊन परिवाराला जेवणातून दिलं विष, कारण वाचून डोकं चक्रावून जाईल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 03:39 PM2022-05-18T15:39:46+5:302022-05-18T15:40:23+5:30
Noida Crime News : पोलिसांनुसार, आई आणि दोन मुलींचं प्रेमप्रकरण सुरू होतं. ज्याला परिवारातून विरोध होत होता. घरातील लोकांनी त्यांचं बाहेर जाणंही बंद केलं होतं.
Noida Crime News : ग्रेटर नोएडामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका सूनेने मुलींसोबत मिळून सासू, सासरा, पती आणि दीराला जेवणातून विष दिलं. मात्र, विषाचा डोज कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. पण जसेही घरातील सर्व सदस्य बेशुद्ध झाले महिला आणि मुली आपापल्या प्रियकरांसोबत फरार झाल्या. घरात कोणतीही हालचाल न दिसल्याने शेजारी लोकांना संशय आला आणि त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी लगेच घरातील सर्व सदस्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलिसांनी फरार महिला आणि तिच्या मुलींना त्यांच्या प्रियकरांसोबत अटक केली.
पोलिसांनुसार, आई आणि दोन मुलींचं प्रेमप्रकरण सुरू होतं. ज्याला परिवारातून विरोध होत होता. घरातील लोकांनी त्यांचं बाहेर जाणंही बंद केलं होतं. त्या आपल्या प्रियकरांसोबत फोनवरही बोलू शकत नव्हत्या. यानंतर तिघींनी मिळून परिवाराच्या हत्येचा प्लान केला, पण विष देताना मुलीचं काळीज पिघळलं. तिने जेवणात कमी विष टाकलं. मुलीला वाटत होतं की, घरातील सदस्यांचा जीव जाऊ नये. विषामुळे महिलेच्या सासूची स्थिती गंभीर झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर घरातील इतर सदस्य घरी परत आले आहेत.
असं सांगितलं जात आहे की, महिलेचे गावातच राहणाऱ्या एका तरूणासोबत अनैतिक संबंध होत. ज्याची माहिती परिवारातील सदस्यांना लागली होती. त्यामुळे घरात नेहमीच वाद होत होता. त्यानंतर महिला घर सोडून गेली होती. बऱ्याच दिवसांनी ती परत आली. यादरम्यान तिच्या दोन मुलींचं गावातील दोन तरूणांसोबत प्रेमप्रकरण सुरू झालं होतं. महिलेला जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा तिने विरोध केला नाही. यादरम्या महिलाही तिच्या प्रियकरासोबत बोलत होती.
एक दिवस आरोपी महिला राजकुमारी तिचा प्रियकर रवींद्रसोबत फोनवर बोलत होती. ते पती देवेंद्रने ऐकलं. देवेंद्रने पत्नी आणि तिच्या प्रियकराला न बोलण्याची धमकी दिली. त्याने पत्नीचा फोनही फोडला. राजकुमारीला आपल्या दोन मुलींना सोबत घेऊन परिवाराला आपल्या मार्गातून हटवायचं होतं.
त्यांनी मिळून प्लान केला आणि यात मुलींचे प्रियकर अभिषेक व दीपकने मुख्य भूमिका निभावली. सर्वांनी मिळून योजना आखली की, परिवाराला विष देऊ त्यांना संपवायचं. पळून जायचं आणि काही दिवसांनी पुन्हा परत यायचं. तेव्हा पूर्ण प्रॉपर्टीवर कब्जा मिळवायचा.
पोलिसांनी सांगितलं की, जेवणात विष टाकून सर्वांना देण्याची जबाबदारी मुलगी अर्चनाची होती. पण जेवणात विष टाकताना मुलीचं काळीज पिघळलं. तिने कमी विष घातलं. जेवणानंतर रात्री ११ वाजता सर्वांची स्थिती बिघडली आणि सगळे बेशुद्ध झाले.
यानंतर महिला तिच्या मुलींच्या प्रियकरांसोबत फरार झाली. घरात काहीच हालचाल झाली नाही तर शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिलं तर धक्का बसला. सगळे बेशुद्ध पडले होते. त्यानंतर पोलीस आले. पोलिसांनी सांगितलं की, महिलेचा प्रियकर या घटनेत सहभागी नव्हता. केवळ मुलींचे प्रियकर यात सहभागी होते. महिलेचं तिच्या प्रियकरासोबत भांडण झालं होतं. ज्यामुळे तिने प्रियकराला हे काही सांगितलं नाही.