मुंबईत हत्येचे सत्र सुरूच; अंधेरीत विवाहितेची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 06:30 AM2021-03-01T06:30:52+5:302021-03-01T06:31:14+5:30

मुंबईत गेल्या महिनाभरात १२ हत्येच्या घटना घडल्या आहेत. अशात फेब्रुवारी महिन्यातही दिवसाआड हत्या, हत्येचा प्रयत्न अशा घटना डोकेवर काढताना दिसत आहेत.

Murder continues in Mumbai; Murder of a married woman in the andheri | मुंबईत हत्येचे सत्र सुरूच; अंधेरीत विवाहितेची हत्या 

मुंबईत हत्येचे सत्र सुरूच; अंधेरीत विवाहितेची हत्या 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वरळीतील ७७ वर्षीय वृद्धेच्या हत्या प्रकरणाने खळबळ उडाली असताना, शनिवारी अंधेरीत विवाहितेच्या हत्येची घटना समोर आली. मुंबईत हत्या सत्र सुरू असून, गेल्या सहा दिवसांत सहा हत्येच्या घटनांची नोंद मुंबई पोलीस दफ्तरी करण्यात आली आहे.


मुंबईत गेल्या महिनाभरात १२ हत्येच्या घटना घडल्या आहेत. अशात फेब्रुवारी महिन्यातही दिवसाआड हत्या, हत्येचा प्रयत्न अशा घटना डोकेवर काढताना दिसत आहेत. यात, वरळीत व्यावसायिक कुटुंबीय बंगल्यातील वरच्या मजल्यावर असताना, तळ मजल्यावर झोपलेल्या वृद्ध महिलेचे हात पाय बांधून लुटीच्या उद्देशाने गुरुवारी तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहे. तसेच गुन्हे शाखाही याचा समांतर तपास करत आहे. यात, केअरटेकर महिलेच्या संगनमताने ही हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी अंधेरीत चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीची हत्या केली.  


वृद्धेची गळा चिरून हत्या
कल्याण :  घरामध्ये एकट्याच राहणाऱ्या हंसाबाई ठककर या वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. पश्चिमकेडील दत्तआळी परिसरात ही घटना घडली आहे. अनेक वेळा संपर्क करूनही त्या फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे नातेवाइकांनी घरी येऊन पाहिले असता, त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

सहा दिवसांत हत्येच्या सहा घटना; पोलिसांकडून तपास सुरू
n२१ फेब्रुवारी : रात्री ११च्या सुमारास कफपरेड येथील धोबी घाट परिसरात राहणाऱ्या रेणुका विठ्ठल राठोड (१९) या विवाहितेची गळा आवळून हत्या करण्यात आली. याप्रकरणी रेणुकाची आई सोनीबाई चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून कफपरेड पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदला आहे.
n२३ फेब्रुवारी : पवई येथील तुंगा गाव परिसरात राजेश हरिकिरण भारद्वाज (४०) याची हत्या करण्यात आली आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
n२४ फेब्रुवारी : गोरेगाव लिंकरोड परिसरात सुरेश उर्फ सुऱ्या मसूद (३८) यांच्या डोक्यावर हातोड्याने वार करून त्यांची हत्या केली. याप्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी तीन आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे.
n२५ फेब्रुवारी : ससूनडाॅक येथे सकाळी साडेसातच्या सुमारास दोन मच्छीमारांमध्ये शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. यात, इस्माईल उर्फ युसूफ शेख (५१) यांची हत्या झाली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, याप्रकरणी कुलाबा पोलीस अधिक तपास करत आहे.
n२५ फेब्रुवारी : वरळी सी फेस परिसरात असलेल्या बंगल्यात राहणाऱ्या ७७ वर्षीय विश्वी डोलवानी यांची लुटीच्या उद्देशाने रात्री दहा ते सव्वाबाराच्या सुमारास हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी वरळी पोलीस तपास करत आहेत.
n२६ फेब्रुवारी : पहाटे साडेचारच्या सुमारास अंधेरी पूर्वेकडील जिजामातारोड परिसरात राहणाऱ्या कविता चौधरी या विवाहितेची पतीनेच गळा दाबून हत्या केली आहे. चारित्र्याच्या संशयातून ही हत्या करण्यात आली असून, एमआयडीसी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत पतीला अटक केली आहे.

Web Title: Murder continues in Mumbai; Murder of a married woman in the andheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून