अंधश्रद्धेमुळे हत्या; हसीना पारकरच्या व्याहीसह चौघे जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 06:46 PM2018-12-24T18:46:40+5:302018-12-24T18:47:17+5:30

धक्कादायक म्हणजे अजीम अमीरशादचा मुलगा ४० दिवसांपूर्वी मरण पावला. त्याचा मृत्यू जादूटोणा, करणी केल्यामुळेच झाला असा गैरसमज झाल्याने राग मनात ठेवून २१ डिसेंबरला वाकोल्यातील लक्की चिकन शॉपकडे अब्दुल्ला खानचा खून केला.   

Murder due to superstition; Hussina Parker's four-fourths tied with the wall | अंधश्रद्धेमुळे हत्या; हसीना पारकरच्या व्याहीसह चौघे जेरबंद 

अंधश्रद्धेमुळे हत्या; हसीना पारकरच्या व्याहीसह चौघे जेरबंद 

Next

मुंबई - वाकोला परिसरात ५६ वर्षीय अब्दुल्ला खान यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. वाकोला पोलीस याप्रकरणी तपासाची चक्र फिरवली असता या हत्याकांडात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहीण हसीना पारकरच्या व्याहीचा हात असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानुसार पोलिसांनी हसिनाचा व्याही अजीम अमीरशाद खान आणि जाहिद उमरशाद खान, गुड्डू युसूफ शेख, जितेंद्र जीवन यादव यांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे अजीम अमीरशादचा मुलगा ४० दिवसांपूर्वी मरण पावला. त्याचा मृत्यू जादूटोणा, करणी केल्यामुळेच झाला असा गैरसमज झाल्याने राग मनात ठेवून २१ डिसेंबरला वाकोल्यातील लक्की चिकन शॉपकडे अब्दुल्ला खानचा खून केला.   

२१ डिसेंबरला दुपारी २.३० वाजताच्या सुमारास वाकोला परिसरातील लक्की चिकन शॉपकडे अब्दुल्ला खान हे जात असताना बिस्मिल्ला मिल्क सेंटरसमोर त्यांना अडवून अजीम अमीरशाद, जाहिद, गुड्डू आणि जितेंद्र यांनी चाकू, सूर्य लोखंडी सळई आणि दांडक्याने मारहाण करून अब्दुल्ला यांचा खून केला होता. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात खुनाचा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पाहिजे आरोपी हे टॅक्सीने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच वाकोला जंक्शन येथे पाळत ठेवून चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशी केल्यानंतर अटक केली. या चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Web Title: Murder due to superstition; Hussina Parker's four-fourths tied with the wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.