वृद्ध सफाई कर्मचाऱ्याची गळा चिरून हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 12:04 PM2021-03-09T12:04:15+5:302021-03-09T12:04:31+5:30

Crime News: गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकासमोर रजत संकुल ही बहुमजली इमारत आहे. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर एका सदनिकेत हेल्थ केअर प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीचे ऑफिस आहे.

murder of elderly Cleaning employee in Nagpur | वृद्ध सफाई कर्मचाऱ्याची गळा चिरून हत्या 

वृद्ध सफाई कर्मचाऱ्याची गळा चिरून हत्या 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हेल्थ केअर प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीच्या एका ऑफिसमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मण मलिक (वय अंदाजे ६५) नामक वृद्धाची गळा कापून अज्ञात आरोपीने हत्या केली. मंगळवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. (old man murder in Nagpur.)


 गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकासमोर रजत संकुल ही बहुमजली इमारत आहे. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर एका सदनिकेत हेल्थ केअर प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीचे ऑफिस आहे. येथे लक्ष्मण मलिक सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. तो मूळचा जरीपटका येथील रहिवासी असून ऑफिस बंद झाल्यानंतर तो तेथेच राहायचा. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी ऑफिसचे कर्मचारी निघून गेल्यानंतर मलिक तेथे थांबला. आज सकाळी १०.१५ च्या सुमारास ऑफिस उघडायला कर्मचारी आले तेव्हा मलिक रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला त्याचे हात मागे बांधून होते आणि गळ्यावर कैची किंवा पेचकस सारख्या शस्त्राचे वार केल्याच्या खुणा होत्या. खाली रक्ताचे थारोळे साचले होते.

कर्मचाऱ्यांनी हे गणेशपेठ पोलिसांना कळविले. गणेशपेठ पोलीसचा ताफा तसेच पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इमारतीतील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. ठसे तज्ञ आणि श्वान पथकही घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर आरोपीचा शोध घेणे सुरू होते.

Web Title: murder of elderly Cleaning employee in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.