कौटुंबिक कलहातून सासर्याची हत्या; आरोपी जावयाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 09:03 PM2021-02-01T21:03:53+5:302021-02-01T21:04:31+5:30
Murder Case : आरोपी ग्वाल्हेर येथून भुसावळ येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे स्थानकाबाहेर पथकाने सापळा रचून त्यास अटक केली.
भुसावळ : जावयानेच कौटुंबिक कलहातून सासर्याची हत्या केल्याची घटना ५ डिसेंबर २० रोजी अकोल्यातील खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निमवाडी येथे घडली होती. या गुन्ह्यात पसार असलेला आरोपी जावायास भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेरून रविवारी ताब्यात घेतले आहे. श्रीराम बाबूराव सपकाळ (चांदूर) असे मयताचे तर मनोज शिवचरन इंगळे (कापशी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी ग्वाल्हेर येथून भुसावळ येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे स्थानकाबाहेर पथकाने सापळा रचून त्यास अटक केली.
भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर झालेल्या अपघात चौघांचा मृत्यू
मृतदेह ठेवले होते पलंगात लपवून; छत्तीसगडचे माजी मंत्री डी. पी. घृतलहरे यांच्या सुनेसह नातीची हत्या
कौटुंबिक कलहातून झाली होती हत्या
श्रीराम सपकाळ यांची कौटुंबिक कलहातून त्यांचा जावई मनोज इंगळे यांयाने नी ५ डिसेंबर २० रोजी हत्या केली होती. आरोपी मनोजचा शोध सुरू केल्यानंतर तो मुंबईत असल्याचे कळताच पथक तेथे गेले मात्र आरोपी तेथून नागपूर निसटला मात्र तेथेही तो आढळला नाही. आरोपी शिवचरण इंगळे हा भुसावळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून त्यास अटक केली. आरोपीला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार डी.सी.खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.