खून, जबरी चोरीची उकल २४ तासात, पोलिसांना प्रशस्तीपत्र, एसपींच्या हस्ते सत्कार
By प्रदीप भाकरे | Published: December 1, 2023 03:45 PM2023-12-01T15:45:02+5:302023-12-01T15:45:17+5:30
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी शुक्रवारी येथे झालेल्या क्राईम मिटिंगदरम्यान त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
अमरावती: तिवसा येथील सराफा व्यावसायिकाची हत्या करून त्यांच्या घरातून तब्बल ७५ लाख रुपयांचा ऐवज चोरून पळणाऱ्या मारेकऱ्यास अवघ्या २४ तासात जेरबंद करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी शुक्रवारी येथे झालेल्या क्राईम मिटिंगदरम्यान त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
२७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी तिवसा येथील सराफा व्यापारी संजय मांडळे हे घरी एकटे असतांना अज्ञात आरोपीने त्यांना ठार मारले होते. तथा घरातील सोने, चांदी व नगदी असा एकुण ७४,६८,००० रुपयांचा ऐवज देखील चोरून नेला होता. घटनेचे गांभिर्य पाहता पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक विक्रम साळी, उप-विभागीय पोलीस अधिकारी सचिन्द्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखा, तिवसा पोलीस स्टेशन व सायबर पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपी रोशन दिगांबर तांबटकर (२५, रा. देऊरवाडा) याला गुन्हयात अटक केली. तथा त्याच्याकडून ७,७५,००० रुपयांचा माल जप्त करण्यात यश मिळविले. सीसीटिव्ही फुटेज व अन्य कुठलाही परिस्थितीजन्य पुरावा नसताना खाकीने २४ तासात मारेकरी पकडला. एसपींनी पत्रपरिषद घेऊन कामगिरी बजावणाऱ्यांना गौरविले जाईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार, १ डिसेंबर रोजी स्थानिक मंथन हॉलमध्ये झालेल्या गुन्हे बैठकीदरम्यान प्रशस्तीपत्र व पुष्प देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यांच्या पाठीवर पडली कौतुकाची थाप
एलसीबीचे पोलीस निरिक्षक किरण वानखडे, तिवसाचे ठाणेदार, प्रदीप ठाकुर, एलसीबीमधील सहायक पोलीस निरिक्षक सचिन पवार, सायबरचे किरण औटे, स्थानिक गु्न्हे शाखेतील उपनिरिक्षक नितीन चुलपार, संजय शिंदे, मुलचंद भांबुरकर, मो. तस्लीम, तिवसाचे पीएसआय राजेश पांडे या अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
टीम एलसीबी, टीम तिवसा
एलसीबीतील अंमलदार त्र्यंबक मनोहर, संतोष मुंदाणे, सुनिल महात्मे, बळवंत दाभणे, पुरुषोत्तम यादव, रविन्द्र बावणे, सचिन मिश्रा, शकिल चव्हाण, भुषण पेठे, युवराज मानमोठे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, रविन्द्र व-हाडे, शांताराम सोनोने, निलेश डांगोरे, अमोल केन्द्रे, से. अजमत, शांताराम सोनोने, मंगेश लकडे, सचिन मसांगे, चंद्रशेखर खंडारे, पंकज फाटे, सुधिर बावणे यांच्यासह तिवसा पोलीस ठाण्यातील रोहित मिश्रा, अरविंद गावंडे, राजेश गावंडे, संतोष अढाऊ, सागर डोंगरे व सायबर पोलिस ठाण्यातील सागर धापड व सरिता चौधरी यांना गौरविण्यात आले.