अनैतिक संबंधातून गर्लफ्रेंडची हत्या, २० पेक्षा अधिक दिवस मृतदेह होता घरात पडून  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 10:09 PM2020-12-18T22:09:23+5:302020-12-18T22:10:34+5:30

Murder : आपल्याला फसवत असल्याच्या त्याला संशय होता. याच संशयातून तिचा गळा आवळून हत्या करून घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला होता.

Murder of girlfriend due to immoral relationship, body lying in the house for more than 20 days | अनैतिक संबंधातून गर्लफ्रेंडची हत्या, २० पेक्षा अधिक दिवस मृतदेह होता घरात पडून  

अनैतिक संबंधातून गर्लफ्रेंडची हत्या, २० पेक्षा अधिक दिवस मृतदेह होता घरात पडून  

googlenewsNext
ठळक मुद्देरोडपली येथील गावठाण भागात भाडोत्री राहणाऱ्या लीपी सागर शेख (२६) या महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

नवी मुंबई : अनैतिक संबंधातून बांग्लादेशी महिलेच्या हत्ये प्रकरणी कळंबोली पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हत्येनंतर सुमारे २० हुन अधिक दिवस मृतदेह घरात पडून होता. मात्र  दोन मैत्रिणी त्याठिकाणी रहायला आल्या असता प्रकार उघडकीस आला.

रोडपली येथील गावठाण भागात भाडोत्री राहणाऱ्या लीपी सागर शेख (२६) या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. ती ज्याठिकाणी राहायची त्याच ठिकाणी इतर दोन महिला तिच्यासोबत राहायच्या. मात्र लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने त्या दोन्ही महिला बांग्लादेशला निघून गेल्या होत्या. ६ तारखेला त्या पुन्हा आल्या असता घराला बाहेरून कुलूप होते. यामुळे त्यांनी घर मालकाला कळवून कुलूप तोडले असता आतमध्ये लीपी शेख हिचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पुर्नपणे कुजलेल्या अवस्थेत होता. याप्रकरणी कळंबोली पोलिसठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक दिलीप गुजर, सहायक निरीक्षक ऋषिकेश घाडगे, नितीन कुंभार, मनेश बच्छाव, अर्चना गाढवे, कृष्णांत माळी, संजय भोरे आदींचे पथक केले होते. त्यांनी परिसरात सखोल चौकशी केली असता, काही दिवसांपासून तिच्यासोबत एक तरुण राहत होता अशी माहिती समोर आली. मात्र त्याच्याविषयी कोणाला माहिती नव्हती. अखेर कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी मोहम्मद अली मुदस्सर शेख (२४) याला मुंब्रा येथून अटक केली. तो देखील मूळचा बांग्लादेशी असून विवाहित आहे. लीपी शेख हि महिला पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर मोहम्मद याच्या संपर्कात आली होती. त्यामुळे काही महिन्यांपासून दोघे एकत्र राहत होते. मात्र यादरम्यान ती पुन्हा पहिल्या पतीच्या संपर्कात असल्याची चाहूल मोहम्मद याला लागली होती. यावरून ती आपल्याला फसवत असल्याच्या त्याला संशय होता. याच संशयातून तिचा गळा आवळून हत्या करून घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला होता.
 

Web Title: Murder of girlfriend due to immoral relationship, body lying in the house for more than 20 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.