नागपूर हत्याकांड: गळा घोटल्यानं पत्नीची जीभ बाहेर आली; सासू खोलीत आल्यावर म्हणाला, बघा ना मरत पण नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 08:40 AM2021-06-23T08:40:59+5:302021-06-23T08:43:10+5:30
मुलीच्या मृत्यूचा शोक करणाऱ्या सासूलाही क्षणात संपविले
- नरेश डोंगरे
नागपूर : आलोकने गळा घोटल्यामुळे अमिषाची जीभ बाहेर आली होती. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. तिचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. तर, अंगात सैतान संचारलेला आलोक ती लवकर मरावी म्हणून वाट बघत होता. आतल्या खोलीत असलेली सासू या दोघांच्या खोलीत आली तेव्हा तो म्हणाला, बघा ना मरत पण नाही... अन् नंतर त्याने चाकूने अमिषाचा गळा चिरला...
पाचपावलीतील पाच जणांच्या हत्याकांडाचे अनेक पैलू गुलदस्त्यात आहेत. ते उलगडण्यासाठी पोलीस यंत्रणा ३६ तासांपासून काम करत आहे. पोलिसांना अमिषाचा मोबाईल सापडला असून त्यातील ऑडिओ क्लीपवरून आलोक घरी आल्यापासून दोघींच्या हत्येचा घटनाक्रम रेकॉर्ड झाला आहे. २७ मिनिटांची ही क्लीप आहे.
अमिषाने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केल्यामुळे तो क्षुब्ध झाला होता. ‘तू मेरी नही तो किसी और की भी नही’ असे म्हणत तिला संपविण्याचा त्याने निर्णय घेतला होता. आलोक रविवारी रात्री अमिषाच्या घरी गेला. त्याची देहबोली बघून अमिषाला धोका लक्षात आला होता.
तू आला का... ये... आता लाजतोस कशाला?
अमिषा - तू आला का... ये ... आता लाजतोस कशाला ...
(दोघांचे हसणे खिदळणे.. एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव... शरीरसंबंधाची तयारी.. काही वेळानंतर...)
आलोक - तू माझी पोलिसांकडे तक्रार का केली...?
अमिषा - म्हणजे काय, मी का तुझी (...) आहे का? मी माझ्या मनाची मालकीण आहे. तू आपले काम कर...
आलोक - तू चांगली वाग...
अमिषा - तू चांगला वाग, अन्यथा पुन्हा तुझी तक्रार करेन...
(अमिषाचे हे वाक्य त्याच्या जिव्हारी लागते अन् तो अचानक हिंसक झाला. दोघे एकमेकांना अश्लील शिव्या देतात. तो मारहाण करून अर्धनग्न अवस्थेतील अमिषाचा गळा घोटतो. ती आचके देत असते. तेवढ्यात त्या खोलीत अमिषाची आई लक्ष्मीबाई येते. त्यांना बघून ही मरत का नाही...असा सवाल आलोक करतो. अमिषाला संपवतो.)
लक्ष्मीबाई - जावई ... तुम्ही हे काय केले...
आलोक - तुम्ही ओरडू नका, लोक जागतील.. गप्प राहा... त्याचक्षणी लक्ष्मीबाईंची किंकाळी (त्याने त्यांचाही गळा कापला).