डोक्यात लोखंडी रॉड मारून विवाहितेची हत्या; आरोपी पतीस अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 05:41 PM2018-08-31T17:41:02+5:302018-08-31T17:42:24+5:30

बुलडाणा : चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात लोखंडी रॉड मारून विवाहितेची हत्या केल्याची घटना येथील चिखली रस्त्यावरील शिवशंकर नगर परिसरात गुरूवारी उशिरा रात्री घडली.

Murder; hit iron rod; The accused is arrested |  डोक्यात लोखंडी रॉड मारून विवाहितेची हत्या; आरोपी पतीस अटक 

 डोक्यात लोखंडी रॉड मारून विवाहितेची हत्या; आरोपी पतीस अटक 

Next

बुलडाणा : चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात लोखंडी रॉड मारून विवाहितेची हत्या केल्याची घटना येथील चिखली रस्त्यावरील शिवशंकर नगर परिसरात गुरूवारी उशिरा रात्री घडली. याप्रकरणी मृतक विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पतीस शुक्रवारी अटक करण्यात आली असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलडाणा तालुक्यातील पळसखेड भट येथील मृतकाची आई निर्मला प्रल्हाद निकाळजे यांनी बुलडाणा शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली की, बुलडाणा-चिखली रस्त्यावरील शिवशंकर नगरातील राहूल शंकर कांबळे (वय ३०) व वैशाली राहूल कांबळे (वय २६) यांचा काही वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र दोन्ही घरातील जेष्ठ मंडळी या विवाहाविषयी नाराज होती. दरम्यान, आरोपी राहूल कांबळे काही कामधंदा करीत नव्हता, त्यातच त्याला दारूचे व्यसन लागले होते. तर वैशाली कांबळे घरोघरी घरकाम करून संसाराचा गाडा ओढीत होती. राहूल हा कामानिमित्त बाहेर जात असलेल्या आपल्या पत्नीवर संशय घेत होता. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती. गुरूवारी रात्री पुन्हा संशयावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात राहूल कांबळे यांने पत्नी वैशाली कांबळे हिच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार वार करून गंभीर जमखी केले. त्यामुळे वैशाली रक्ताच्या थारोळ््यात पडली. यावेळी आरोपी राहूल कांबळेचे वडिल शंकर कांबळे यांनी जखमी वैशाली कांबळे हिला जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती केले. मात्र उपचारादरम्यान वैशाली कांबळे हिचा मृत्यू झाला. याबाबत मृतक वैशाली कांबळे हिची आई निर्मला निकाळजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी राहूल कांबळे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ठाणेदार यु. के.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश यादव यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक राजू नागलोत, भगवान कºहाडे करीत आहेत.

Web Title: Murder; hit iron rod; The accused is arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.