Murder : नवविवाहितेच्या हत्याप्रकरणी पतीला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 19:44 IST2021-03-17T19:44:10+5:302021-03-17T19:44:47+5:30
Murder Case : साडेतीन महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, वलगाव पोलिसात खुनाचा गुन्हा

Murder : नवविवाहितेच्या हत्याप्रकरणी पतीला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी
अमरावती - साडेतीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या १९ वर्षीय विवाहितेचा पतीने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना वलगाव येथे मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी गणेश नामदेवराव मालवे (२४, रा. सतीनगर, वलगाव) असे मारेकरी पतीने नाव आहे. पोलिसांनी आराेपीस न्यायालयात हजर केले असता २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस सूत्रानुसार, सोनू गणेश मालवे (१९, रा. सतीनगर वलगाव) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. सोनू आणि गणेश यांचा डिसेंबर २०२० मध्ये विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसांनी गणेश हा सतत पत्नी सोनूवर संशय घेत होता. यातूनच यापूर्वी एक ते दोन वेळा त्यांच्यात वाद झाला.त्यावेळी गणेशने सोनूला मारहाण केली होती. तो नेहमीच तिचा छळ करीत होता. त्यामुळे साेनू ही काही दिवसांपूर्वी वडिलांकडे गेली होती. मात्र, परत पतीकडे आली होती. दरम्यान सोमवार, १५ मार्च च्या रात्री पुन्हा या पती-पत्नीत याच कारणावरून वाद झाला. या वादातच मध्यरात्रीचच्या सुमारास गणेशने सोनूचा गळा दाबून खून केल्याचा आरोप सोनूचे वडील श्रीकृष्ण गुलाबराव सोळंके (५१. रा. तेल्हारा, अकोला) यांनी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरुन सोनूचा पती गणेश मालवे याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पालिसांनी बुधवारी आरोपी गणेश याला न्यायालयात हजर केले असता २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. याप्रकरणी ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनात एपीआय मनीष वाकोडे हे तपास करीत आहेत.