100 रुपयांच्या वादात हत्या करत आत्महत्येचा बनाव; मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 02:17 PM2022-02-07T14:17:45+5:302022-02-07T14:19:13+5:30

राजू पाटील याची हत्या करण्यात आली आहे. पाटील आणि कोकाटेमध्ये गेल्या ८ वर्षँपासून मैत्री होती. मात्र, याच दरम्यान कोकाटेच्या मामे भावाकडून घेतलेले १०० रुपये न देता त्याला शिवीगाळ केल्याच्या रागात दोघांमध्ये वाद होऊ लागले.

Murder in Mumbai; Attempts to destroy evidence by burning bodie | 100 रुपयांच्या वादात हत्या करत आत्महत्येचा बनाव; मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

100 रुपयांच्या वादात हत्या करत आत्महत्येचा बनाव; मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

Next

मुंबई : मामे भावाचे १०० रुपये न देता त्याला शिवीगाळ केल्याच्या रागात मित्रानेच गॅरेजमधील दोरीने मित्राचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून पेटवून देत आत्महत्येचा बनाव केल्याचा प्रकार दहिसरमध्ये  समोर आला आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी परमेश्वर कोकाटेला अटक केली.

राजू पाटील याची हत्या करण्यात आली आहे. पाटील आणि कोकाटेमध्ये गेल्या ८ वर्षँपासून मैत्री होती. मात्र, याच दरम्यान कोकाटेच्या मामे भावाकडून घेतलेले १०० रुपये न देता त्याला शिवीगाळ केल्याच्या रागात दोघांमध्ये वाद होऊ लागले. ते दहिसर येथील एका गॅरेजमध्ये राहत होते. ४ फेब्रुवारी रात्रीसाडे आठच्या सुमारास सोबत दारू प्यायल्यानंतर याच १०० रुपयांवरून त्यांच्यात वाद झाले. कोकाटेने रागात त्याला खाली पाडले. गॅरेजमधील दोरीने त्याचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर, तेथील काही कपडे आणि ब्लकेटमध्ये त्याला गुंडाळून रात्री पेटवून दिले. थोड्या वेळाने आग लागली, असे ओरडत पाटीलने आत्महत्या केल्याचा बनाव केला. स्थानिकांच्या मदतीने आग विझवत याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. दहिसर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत, शोध सुरू केला.

असा झाला उलगडा
ब्लँकेटमध्ये स्वतःला गुंडाळून कोणी आत्महत्या कसे करू शकतो? यामुळे पोलिसांनी कोकाटेकडे उलटतपासणी सुरू केली. सुरुवातीला तो मी नव्हेच म्हणणाऱ्या कोकाटेने अखेर, गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी आरोपीला अटक करत त्याला ५ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी सांगितले.

Web Title: Murder in Mumbai; Attempts to destroy evidence by burning bodie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.