हत्याकांड चोरीच्या उद्देशानेच; पोलीस धागेदोरे जुळवण्याच्या तयारीत, CCTV सह मोबाईल लोकेशनवर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 10:58 PM2021-11-02T22:58:29+5:302021-11-02T23:00:00+5:30

सावंतवाडीतील दुहेरी हत्याकांड पहिल्यांदा  मालमत्तेचा वादातून घडले असावे अशी चर्चा होती.

murder with intent to steal police emphasis on mobile location with CCTV as prepare to match threads | हत्याकांड चोरीच्या उद्देशानेच; पोलीस धागेदोरे जुळवण्याच्या तयारीत, CCTV सह मोबाईल लोकेशनवर भर

हत्याकांड चोरीच्या उद्देशानेच; पोलीस धागेदोरे जुळवण्याच्या तयारीत, CCTV सह मोबाईल लोकेशनवर भर

Next

सावंतवाडी:सावंतवाडीतील दुहेरी हत्याकांड पहिल्यांदा  मालमत्तेचा वादातून घडले असावे अशी चर्चा होती पण आता मालमत्तेचा वाद मागे पडला असून पोलीस या हत्या चोरीच्या प्रकारातूनच घडल्या असाव्यात या निष्कर्षा पर्यत आले आहेत पण ठोस असा पुरावा नसल्याने अद्याप पर्यत कोणालाही ताब्यात घेतले नाही.त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाईल  लोकेशन पोलिसांनी हस्तगत केले असून त्यातून काहि संशयिताचे जाबजबाब ही घेण्याचे काम सुरू केले आहे.दरम्यान सायकाळी उशिरा पोलीस उपअधीक्षक नितीन काटेकर यांनी सावंतवाडीत येऊन तपासाचा आढावा घेत पोलीसांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत.

सावंतवाडीत दोन दिवसांपूर्वी घडलेल्या दोन वृद्ध महिलांच्या हत्याकांडाचे कोडे सोडविण्यात अद्याप पर्यंत पोलिसांना यश आले नसून कुणालाही ताब्यात घेण्यात आले नाही सध्या ही घटना मालमत्ता वादातून घडली की चोरीच्या उद्देशाने घडली याचाच पोलीस तपास करत असून मृता मधील एक नीलिमा खानविलकर हिचा भाचा राजीव पार्टये यांनी मालमत्तेची सर्व कागदपत्रे मंगळवारी पोलिसांच्या स्वाधीन केल्याने या कागदपत्रांची छाननी च्या आधारावर  हा वाद मालमत्तेचा नसल्याचे पोलिसांकडून सध्या तरी स्पष्ट करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.

पण खानविलकर यांच्या गळ्यातील सोन्याची चेन नसल्याचे या प्रकरणातील तक्रारदार राजू मसूरकर यांनी सागितले असून अद्याप पर्यत पोलीसांनी मात्र चेन नसल्याचे सागितले नाही तर दुसरी कडे पोलीसांनी या घटनेच्या सर्दभात अनेकांचे जबाब नोंदवण्यास सुरूवात केली असून यातून काहि ठोस पुरावा हाती लागतो का याची माहिती पोलीस घेत आहेत पण अद्याप पोलीस निरंक असून कोणताही ठोस पुरावा हाती लागला नसल्याचे पोलीस सांगत आहेत पण आम्ही पूर्ण पणे आशावादी असून निश्चित पणे लवकरच आमच्या हाती कोणता ना कोणता पुरावा लागेल असे पोलीस सांगत आहेत.

दरम्यान पोलीस उपाधीक्षक नितीन काटेकर यांनी मंगळवारी उशिरा सावंतवाडी पोलिस ठाण्याला भेट देऊन दिवसभराच्या तपासाची माहिती घेतली तसेच तपास अधिकाऱ्यांना आणखी काय करावे लागणार तपास कसा करायचा कुणाला ताब्यात घेऊन तपास केला पाहिजे याची माहिती दिली तसेच पोलीस या सर्व प्रकरणात वेगवेगळ्या बाजूचा अभ्यास करत असले तरी पोलीसांची खरी भिस्त ही मोबाईल लोकेशन तसेच सीसीटीव्ही तून कोण आढळून येतो का?यावरच अवलंबून राहावे लागणार आहे.

आला पुढून आणि गेला मागच्या दरवाजातून 

ज्या दोन महिलांचे हत्याकांड झाले त्यातील सशयित हा पुढच्या दरवाजातून आला हत्याकांड केल्यानंतर तो मागच्या दरवाजातून निघून गेला असा पोलीसाचा अदाज असून त्यानेच टिव्ही ची बटण बंद केली असावीत तसेच पुढचा दरवाजा ही उघडा होता तसा मागचा दरवाजा उघडा असल्याचे पोलीसांनी सांगितले.
 

Web Title: murder with intent to steal police emphasis on mobile location with CCTV as prepare to match threads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.