तिघा रिक्षाचालकांनी केली दुचाकीस्वाराची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 06:56 AM2020-01-22T06:56:27+5:302020-01-22T06:57:03+5:30

रस्त्यात उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगणाऱ्या एका दुचाकीस्वारासह त्याच्या दोन मित्रांवर तिघा रिक्षाचालकांनी आपल्या दोन रिक्षाचालक साथीदारांच्या मदतीने हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत सोमवारी रात्री घडली.

murder in kalyan | तिघा रिक्षाचालकांनी केली दुचाकीस्वाराची हत्या

तिघा रिक्षाचालकांनी केली दुचाकीस्वाराची हत्या

Next

कल्याण : रस्त्यात उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगणाऱ्या एका दुचाकीस्वारासह त्याच्या दोन मित्रांवर तिघा रिक्षाचालकांनी आपल्या दोन रिक्षाचालक साथीदारांच्या मदतीने हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत सोमवारी रात्री घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रतीक गावडे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, त्याच्या दोन जखमी मित्रांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डोंबिवली पूर्वेतील दावडीनाका परिसरातून गावडे हा बाली जयस्वाल, निलेश भुणे या मित्रांसह दुचाकीवरून जात होता. यावेळी, रिक्षाचालक रवी लगाडेची रिक्षा रस्त्यात उभी होती. त्यामुळे प्रतीकने त्याला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. यावरून रवी आणि प्रतिकमध्ये वाद झाला. रवीने ही बाब शेलार नाका येथे राहणारा रिक्षामालक रमेश उर्फ झांगºया याला सांगितली. यावेळी, रमेशने प्रतीकसह त्याच्या मित्रांना शेलारनाका येथे बोलावल्याने तिघेही शेलारनाका येथे रात्री ११.३० च्या सुमारास आले. तेथे यांच्यामध्ये पुन्हा झालेल्या वादातून रमेशसह रवी आणि चंद्या जमादार यांनी आपल्याकडील चॉपरने प्रतीक व त्याच्या दोघा मित्रांवर हल्ला केला.

या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी, गंभीर जखमी झालेल्या प्रतीकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून रमेश, चंद्या आणि रवीविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.

गुन्हेगारी वाढली; कारवाईची मागणी

डोंबिवलीत घडलेल्या या हत्येमुळे रिक्षाचालकांच्या मुजोरीबरोबरच आता त्यांची गुन्हेगारी वृत्तीही पुन्हा उघडकीस आली आहे. रात्री-अपरात्री हत्यारे घेऊन फिरणाºया रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी या प्रकरणानंतर जोर धरू लागली आहे.

Web Title: murder in kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.