पुण्यात प्रेमप्रकरणातून प्रेयसीची निर्घृण हत्या; आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 15:29 IST2019-02-24T15:28:58+5:302019-02-24T15:29:33+5:30
दोघांमध्ये मतभेद झाल्याने सोमेशने धारधार हत्याराने सोनालीचा गळा चिरल्याची घटना घडली. ही घटना साधारणतः ३-४ दिवसापूर्वी घडली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पुण्यात प्रेमप्रकरणातून प्रेयसीची निर्घृण हत्या; आरोपी फरार
पुणे : येथील झील कॉलेज मध्ये शिक्षण घेत असणारी सोनाली भिंगार दिवे गेल्या ४-५ दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी पोलिसांकडे केली होती. मात्र, कॉलेजजवळच नुकतीच भाड्याने रूम घेवून संशयित आरोपी सोमेश घोडके व सोनाली हे एकत्र राहत होते.
या दोघांमध्ये मतभेद झाल्याने सोमेशने धारधार हत्याराने सोनालीचा गळा चिरल्याची घटना घडली. ही घटना साधारणतः ३-४ दिवसापूर्वी घडली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आरोपी सोमेश याने चिट्टी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये मी स्वतः ही आत्महत्या करणार असल्याचे त्यात त्याने नमूद केले आहे.
याप्रकरणी अधिक तपास सिंहगड रस्ता पोलीस करत आहेत.