डोंबिवलीत विवाहितेची हत्या; कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 06:32 AM2021-03-02T06:32:38+5:302021-03-02T06:33:02+5:30

लोढा हेवन परिसरातील भवानी चौकात राजेश हा १० वर्षांपासून भाडेतत्त्वावर रेशनिंग दुकान चालवितो. रविवारी रात्रीच्या सुमारास राजेश, त्याची पत्नी श्वेता आणि नोकर गुडीकुमार असे तिघे दारू पित बसले होते

Murder of a married woman in Dombivli; The reason is still unclear | डोंबिवलीत विवाहितेची हत्या; कारण अद्याप अस्पष्ट

डोंबिवलीत विवाहितेची हत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवलीत : पूर्वेतील लोढा हेवन परिसरातील रेशनिंग दुकान चालविणाऱ्या दुकानदाराची पत्नी श्वेता गुप्ता हिची हत्या झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. पती राजेश याने याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयावरून दुकानातील नोकर गुडीकुमार सिंग याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र, हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 


लोढा हेवन परिसरातील भवानी चौकात राजेश हा १० वर्षांपासून भाडेतत्त्वावर रेशनिंग दुकान चालवितो. रविवारी रात्रीच्या सुमारास राजेश, त्याची पत्नी श्वेता आणि नोकर गुडीकुमार असे तिघे दारू पित बसले होते. काही कारणावरून त्यांच्यात वाद झाल्याने राजेश दुकानाबाहेर निघून गेला. त्यानंतर गुडीकुमारने राजेशला मोबाइलवर फोन करून तुमच्या पत्नीने स्वत:ला जखमी करून घेतल्याची माहिती दिली. 


राजेश जेव्हा घरात आला तेव्हा श्वेता ही रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आली.  तिच्या गळ्यावर आणि पोटावर वार केलेले होते. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीदादा चौरे, सहायक पोलीस निरीक्षक  जे.डी. मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी दुकानातील गुडीकुमार याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू  असल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. 


हत्यांचे सत्र सुरूच 
मागील आठवड्यात २१ फेब्रुवारीच्या रात्री कल्याण पश्चिमेतील सापर्डे गावात सुवर्णा गोडे हिची परिसरातच राहणाऱ्या पवन म्हात्रे या तरुणाने हत्या केली. तर, दोन दिवसांपूर्वीच शनिवारी  कल्याण पश्चिमेतील दत्तआळी परिसरात एका ७० वर्षीय हंसाबेन ठक्कर हिची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास बाजारपेठ पोलीस करीत असतानाच
डोंबिवलीत महिलेची हत्या झाल्याचे समोर आले आहे.
मोबाइल चोरट्याने केली रिक्षाचालकाची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : पूर्वेकडील गावराईपाड्याच्या रॉकसन कंपाऊंडमध्ये सोमवारी संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास एका इसमाने रिक्षाचालकाची चाकूने भोसकून  हत्या केल्याची घटना घडली आहे.  तुळींज पोलिसांनी रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ते फरार आरोपीचा शोध घेत आहेत.   
       नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन येथील शर्मा वाडीमध्ये किशन शुक्ला (२५) हा राहत असून तो रिक्षा चालवतो. सोमवारी संध्याकाळी पावणे पाचला रिक्षा चालवत असताना आरोपीने प्रवास करण्यासाठी किशनची रिक्षा थांबवली. एकटा रिक्षाचालक असल्याने त्याला लुटण्यासाठी मोबाइल खेचल्याने आरोपीसोबत झटापट झाली. आरोपीने त्याचा पाठलाग करून त्याला जमिनीवर पाडून त्याच्याकडे असलेल्या चाकूने गळ्यावर आणि छातीत चाकू खूपसून मोबाइल घेऊन आरोपी पळाला. स्थानिक जखमीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला आहे. 
 

Web Title: Murder of a married woman in Dombivli; The reason is still unclear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून