माथाडी कामगाराच्या हत्येचा ८ वर्षांनंतर उलगडा, आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 01:22 AM2020-11-06T01:22:17+5:302020-11-06T01:31:39+5:30

Murder of Mathadi worker revealed after 8 years : पैसे लुटण्यासाठी ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

Murder of Mathadi worker revealed after 8 years, accused arrested | माथाडी कामगाराच्या हत्येचा ८ वर्षांनंतर उलगडा, आरोपीला अटक

माथाडी कामगाराच्या हत्येचा ८ वर्षांनंतर उलगडा, आरोपीला अटक

googlenewsNext

नवी मुंबई :  एपीएमसीजवळ डिसेंबर २०१२ मध्ये आनंदा सुकाळे या माथाडी कामगाराची हत्या झाली होती. या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दशरथ कांबळे याला अटक केली आहे. पैसे लुटण्यासाठी ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
तुर्भे एस. टी. डेपोच्या भूखंडावर २९ डिसेंबर २०१२ रोजी माथाडी कामगार आनंदा सुकाळे याचा मृतदेह आढळला होता. त्याच्या डोक्यावर वार करून नायलॉनच्या रस्सीने गळा आवळून खून करण्यात आला होता. या घटनेमुळे एपीएमसी परिसरात प्रक्षोभक वातावरण निर्माण झाले होते. आरोपी न सापडल्यामुळे ऑगस्ट २०१३ मध्ये या गुन्ह्याचा तपास तात्पुरता थांबविण्यात आला होता. मे २०१६ मध्ये पुन्हा तपास सुरू केला व फेब्रुवारी २०१७ मध्ये तो पुन्हा बंद करण्यात आला. पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग यांनी तपास न लागलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यावर लक्ष देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. यामुळे माथाडी कामगाराच्या हत्येच्या गुन्ह्याचाही पुन्हा तपास सुरू करण्यात आला. गुन्हे शाखा कक्ष दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, गणेश कराड व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला व तुर्भे येथे राहणाऱ्या दशरथ कांबळे उर्फ आप्पा याला अटक केली.

पथकाचे सर्वत्र कौतुक
अटक केलेला आरोपी हा मयत आनंदा याच्या परिचयाचा होता. आनंदा हा जुगारात २५ हजार रुपये जिंकला होता. ते पैसे लुटण्यासाठी आरोपीने भाजीपाला मार्केटमध्ये त्याच्यावर हल्ला केला व त्याचा खून केला. मृतदेह नाल्याजवळ गवताने झाकून ठेवला. दुसऱ्या दिवशी मृतदेह रिक्षात ठेवून तो एस. टी. डेपोच्या भूखंडावर टाकून पसार झाला. आरोपीवर यापूर्वीही जबरी चोरी, चोरी, दरोडा असे गुन्हे दाखल आहेत. त्याला हद्दपारही केले होते. आठ वर्षांपासून तो तपास यंत्रणेला गुंगारा देत होता. फाईल बंद झालेल्या प्रकरणातील आरोपीला जेरबंद केल्यामुळे तपास करणाऱ्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एपीएमसीत प्रक्षोभक वातावरण
या घटनेमुळे एपीएमसी परिसरात प्रक्षोभक वातावरण निर्माण झाले होते. आरोपी न सापडल्यामुळे ऑगस्ट २०१३ मध्ये या गुन्ह्याचा तपास तात्पुरता थांबविण्यात आला होता

Web Title: Murder of Mathadi worker revealed after 8 years, accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.