अलीगडमधील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी एसआयटी तपासात समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 03:48 PM2019-06-08T15:48:44+5:302019-06-08T15:48:58+5:30

उत्तर प्रदेशातील अलीगड येथे अडीच वर्षाच्या मुलीच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. या मुलीच्या हत्येबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे.

murder of a minor girl in Aligarh : Four arrested | अलीगडमधील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी एसआयटी तपासात समोर आली धक्कादायक माहिती

अलीगडमधील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी एसआयटी तपासात समोर आली धक्कादायक माहिती

Next

अलीगड -  उत्तर प्रदेशातील अलीगड येथे अडीच वर्षाच्या मुलीच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. या मुलीच्या हत्येबाबत खळबळजनक माहिती समोर येत असून, अनेक  यातना देऊन या मुलीची हत्या करण्यात आल्याचे तसेच तिच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या मुलीच्या हत्ये प्रकरणी आज एका महिलेसह अजून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणात अटक आरोपींची संख्या 4 झाली आहे. पैशांच्या देवाणघेवाणीतून झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी मुलीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

यापूर्वी जाहीद आणि अस्लम या आरोपींना आधीच अटक करण्यात आली होती. आज तिसरा आरोपी मेहदी हसन आणि अन्य एका महिला आरोपीला अटक करण्यात आली.  जाहीद आणि अस्लम यांनी या मुलीची गळा आवळून हत्या केली. तसेच मेहदी हसन आणि जाहीदच्या पत्नीने त्यांना हत्येसाठी मदत केल्याचे समोर आले आहे. 

 पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह अस्लमच्या घरी ठेवण्यात आल्याचे आरोपींनी सांगितले. मात्र मृतदेह ओलावा असलेल्या ठिकाणी किंवा फ्रिजमध्ये ठेवण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. तसेच मुलीचा मृतदेह ज्या ओढणीत गुंडाळलेला होता ती जाहीदच्या पत्नीची होती. तिलाही या हत्या प्रकरणात चौथी आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. 

अलीगढपासून तालानगरी पन्नास किलोमीटरवर आहे. मुलीच्या वडिलांनी गावातीलच एकास ४० हजार रुपये उसने दिले होते. शिल्लक ५ हजार रुपये परत मागितल्याने तो संतापला. त्याने वाईट परिणाम होतील,अशी धमकी दिली. साथीदाराच्या मदतीने मुलीचा खून केला. जाहीद असे त्याचे नाव असून असलम हा त्याचा साथीदार त्याचा शेजारी आहे. 

अलीगढचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अशोक कुलहारी यांनी मुलीच्या खून प्रकरणी हलगर्जीपणा केल्याबद्दल टप्पल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक, ३ फौजदारांसह एका शिपायास निलंबित केले आहे. 
 

Web Title: murder of a minor girl in Aligarh : Four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.