आत्महत्या नव्हे हत्याच! कल्याणमधील तरुणी मृत्यूप्रकरणी 'या' दिशेने तपास व्हावा; चित्रा वाघ यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 09:01 PM2022-06-16T21:01:58+5:302022-06-16T21:06:26+5:30

Murder and Suicide : पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हत्येच्या अनुषंगाने करावा अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

Murder, not suicide! The death of a young girl in Kalyan should be investigated in this direction; Demand by Chitra Wagh | आत्महत्या नव्हे हत्याच! कल्याणमधील तरुणी मृत्यूप्रकरणी 'या' दिशेने तपास व्हावा; चित्रा वाघ यांची मागणी

आत्महत्या नव्हे हत्याच! कल्याणमधील तरुणी मृत्यूप्रकरणी 'या' दिशेने तपास व्हावा; चित्रा वाघ यांची मागणी

googlenewsNext

कल्याण - कल्याणमधील एका अल्पवयीन तरुणीने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारून आत्महत्या केली. तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिला ब्लॅकमेल करण्यात येत होते. मात्र तिच्या परिवाराचे म्हणणो आहे की, तिची आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हत्येच्या अनुषंगाने करावा अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.


पिडीत तरुणीच्या कुटुंबीयांची भेट भाजप नेत्या वाघ यांनी आज सायंकाळी घेतली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक बसीर शेख यांची भेट घेतली. या भेटी पश्चात वाघ यांनी सांगितले की, पिडीत तरुणीवर चार वर्षापासून लैगिंक अत्याचार केला जात होता. ही मुलगी नुकतीच १२ वीत ७१ टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाली होती. ती अल्पवयीन होती. या प्रकरणात ७ तरुण आणि २ तरुणींचा समावेश आहे. त्यापैकी एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या तरुणीचा शोध सुरु आहे. आत्महत्या झाली तेव्हा एका मुलीसह अन्य आरोपी तिच्या सोबतच होते. त्यामुळे तिच्या कुटुंबियानी माहिती दिली आहे की, मुलीने आत्महत्या केली नसून तिला ढकलून देऊन मारण्यात आले आहे. पोलिसांनी केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. 

लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीने संपवलं आयुष्य, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी

इस्टाग्रामवरील अॅपवर पिडीत तरुणीला व्हीडीओ दाखवून तिला ब्लॅकमेल केले जात होते. त्यामुळे आयटी कायद्याचे कलम आणि बलात्काराचे कलम लावले गेले पाहिजे. पोलिसांनी ते लावलेले नाही. शक्ती कायद्यानुसार काही कलमे लावली गेलेली नाही. ही कलमे लावून पिडीत तरुणीच्या कुटुंंबीयांना न्याय द्यावा. या प्रकरणात बडय़ा घरच्या मुलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तिच्या आई वडिलांवर दबाव टाकला जात आहे. पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावे. तसेच मुलीच्या मामाला तपासाची माहिती वेळोवेळी द्यावी. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना एफआरआयची कॉपी दिली नव्हती. तिचे कुंटुंबिय जबाब देण्याच्या मनस्थितीत नाही. ८ दिवसांनी तिच्या आई वडिलांचा सविस्तर जबाब घेतल्यास त्यातून आणखीन वेगळी परिस्थिती बाहेर येऊ शकते. संबंधित आारोपींनी अन्य कोणासोबत हाच प्रकार केला आहे का हे देखील उघड होऊ शकतो असे वाघ यांनी सांगितले.

 

Web Title: Murder, not suicide! The death of a young girl in Kalyan should be investigated in this direction; Demand by Chitra Wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.