हडपसरमध्ये सराईत गुन्हेगाराची हत्या, पूर्ववैमनस्यातून केले कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 10:05 AM2020-05-23T10:05:21+5:302020-05-23T10:05:53+5:30

हत्या झालेली व्यक्ती हडपसर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होती. त्याच्यावर मारहाणीचे अनेक गुुन्हे दाखल आहेत.

Murder of a notorious criminal in Hadapsar | हडपसरमध्ये सराईत गुन्हेगाराची हत्या, पूर्ववैमनस्यातून केले कृत्य

हडपसरमध्ये सराईत गुन्हेगाराची हत्या, पूर्ववैमनस्यातून केले कृत्य

googlenewsNext

पुणे - पुण्यातील सराईत गुन्हेगाराचा पूर्ववैमन्यातून कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे. शोएब मस्जीद शेख (वय १९, रा. भेकराईनगर, हडपसर) असे खुन झालेल्याचे नाव आहे. ही घटना भेकराईनगरमधील सासवड रोडवरील शारदा हॉस्पिटलशेजारील गल्लीत शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ७ ते ८ जण दिसून येत आहेत. 

याप्रकरणी निलेश भाऊसाहेब मेमाणे (वय २६, रा. ढमाळवाडी, भेकराईनगर, हडपसर) या टेम्पोचालकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिसांनी जीवन कांबळे व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब हा हडपसर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर मारहाणीचे अनेक गुुन्हे दाखल आहेत. आरोपी जीवन कांबळे व शोएब एकाच परिसरात राहणारे आहेत. पूर्वी ते मित्र होते. ऑक्टोंबर २०१८ मध्ये शोएब व जीवन कांबळे त्यांच्यात वाद झाला होता. तेव्हा शोएब याने त्याला मारहाण केली होती. त्याचा राग कांबळे याच्या मनात होता. त्याचा बदला घेण्याची तो संधी शोधत होता. जीवन कांबळे याच्यावरही शारिराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. दोघांवरही खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. गेल्या वर्षी  निवडणुकीपूर्वी त्यांना जामीन मिळाला होता.

शोएब हा राज सरकार हा गु्रप चालवत होता. शुक्रवारी सकाळी तो जीवन कांबळे याच्या घरासमोर गेला व त्याने शिवीगाळ केली होती. त्यामुळे जीवन कांबळे व त्याच्या साथीदारांनी काल रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास भेकराईनगर येथे एकट्याला गाठले व त्याच्यावर कोयत्याने वार करुन त्याचा निर्घुण खुन केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सुहास बावचे व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी जीवन कांबळे याच्याबरोबर असणार्‍या तिघांना ताब्यात घेतले असून कांबळेचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Murder of a notorious criminal in Hadapsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.