खळबळजनक! पीपीई किट घातलेल्या नर्सचा आढळला मृतदेह; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 03:01 PM2020-12-07T15:01:09+5:302020-12-07T15:04:20+5:30
Crime News : पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता खळबळजनक माहिती समोर आली आली.
नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. गुजरातच्या वडोदरामध्ये पीपीई किट घातलेल्या एका नर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. वडोदरातील गोत्री परिसरातील वैकुंठ सोसायटीजवळ तिचा मृतदेह सापडला होता.
पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता खळबळजनक माहिती आता समोर आली आली. धक्कादायक बाब म्हणजे नर्सच्या पतीनेच तिची हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलिसांनी माहितीनुसार, शिल्पा पटेल 39 वर्षीय मृत नर्सचं नाव आहे. वडोदरातील एका रुग्णालयात त्या नोकरी करत होत्या. गोत्री परिसरात त्यांचा मृतदेह सापडला होता.
मासेमारीला जाण्यावरून पती-पत्नीत वाद सुरू झाला अन् संतापलेल्या पतीने उचललं टोकाचं पाऊल https://t.co/WaL3zsmjiU#crime#Police
— Lokmat (@MiLOKMAT) December 6, 2020
कामावर जात असताना पतीने त्यांची हत्या केली आणि रस्त्यात तिचा मृतदेह ठेवून तो फरार झाला. पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता त्यांना नर्सच्या पतीवर संशय आला. त्यावेळी त्यांनी अधिक तपास केला असता पतीने हत्या केल्याची कबुली दिली. गेल्या वर्षभरापासून या पती-पत्नीत वाद होत होते. तसेच शिल्पा यांनी देखील पतीला आत्महत्येची धमकी दिली होती अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली आहे.
सतत वाद होत असल्याने रागाच्या भरात आरोपीने अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी नर्सच्या पतीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशामध्ये कोरोनाने थैमान घातलेलं असतानाच अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये पोलिसांच्या टीमवर हल्ला केल्याच्या आरोपावरून एका काँग्रेस आमदाराच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.
रात्री कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांच्या टीमसोबत वाद घातला अन् प्राणघातक हल्ला केलाhttps://t.co/2eKz1uFW1R#crimesnews#crime#Police#Congress
— Lokmat (@MiLOKMAT) December 7, 2020
दारुच्या नशेत काँग्रेस आमदाराच्या मुलाचा पोलिसांच्या टीमवर हल्ला; 3 जणांना अटक
पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कर्नाटकमधील काँग्रेस आमदार नसीर अहमद यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. फैयाज असं नसीर अहमद यांच्या मुलाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री कर्तव्यावर असणाऱ्या बंगळुरू पोलिसांच्या टीमवर दारुच्या नशेत असलेल्या फैयाजने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी फैयाजसोबत आणखी दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांवर केलेल्या हल्ल्यानंतर तो काही वेळ फरार होता. रात्री साडे बाराच्या वाजण्याच्या सुमारास बंगळुरुमधील अमृथल्ली पोलीस स्टेशनजवळ हा सगळा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.