पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील अपहरण करण्यात आलेल्या युवकाची हत्या; पाच अटकेत

By संदीप वानखेडे | Published: July 11, 2024 11:35 PM2024-07-11T23:35:17+5:302024-07-11T23:40:13+5:30

कर्जत नजीक कुजलेल्या अवस्थेत सापडले प्रेत

Murder of a kidnapped youth from a money-making gang Five arrested | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील अपहरण करण्यात आलेल्या युवकाची हत्या; पाच अटकेत

पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील अपहरण करण्यात आलेल्या युवकाची हत्या; पाच अटकेत

संदीप वानखडे, जानेफळ (जि. बुलढाणा): पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील अपहरण करण्यात आलेल्या युवकाचा तब्बल १८ दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेत नगर जिल्ह्यात कर्जत नजीक मृतदेह ७ जुलै राेजी आढळला आहे़ दिलीप भिकाजी इंगळे असे मृतक युवकाचे नाव आहे़ याप्रकरणी जानेफळ पोलिसांनी जानेफळ येथील २ तर सातारा व पुणे जिल्ह्यातील ३ अशा एकूण पाच आरोपींना अटक केली आहे़ यापैकी दाेघांना न्यायालयात हजर केले असताना त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली.

जानेफळ येथील ज्योती दिलीप इंगळे यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत अमाेल जयसिंग राजपूत व इतरांनी माझे पती दिलीप भिकाजी इंगळे याला पैशाचा पाऊस पाडण्याच्या कामासाठी दि.२२ जून रोजी घरून नेले हाेते़ तसेच रात्री कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा नगर येथून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचे म्हटले हाेते. या तक्रारीवरून जानेफळ पोलिसांनी दि.९ जुलै रोजी गुन्हे दाखल केले हाेते.

दरम्यान, कर्जत तालुक्यातील राशीन जवळील वायसे वाडी परिसरात रस्त्याच्या कडेला एका युवकाचा मृतदेह ७ जुलै राेजी आढळला हाेता़ पाेलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून ओळख पटविली असता ताे मृतदेह दिलीप इंगळे यांचा असल्याचे १० जुलै राेजी समाेर आले आहे़ या प्रकरणी पाेलिसांनी ११ जुलै राेजी आरोपी संदीप उर्फ बाबुराव सुभाष शेवाळे वय २४ वर्ष रा. जानेफळ तालुका मेहकर, योगेश रमेश तोंडे वय २८ रा.जानेफळ तालुका मेहकर व बाहेर जिल्ह्यातील ३ जण असे एकूण ५ जणांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या पैकी संदीप सुभाष शेवाळे व योगेश रमेश तोंडे यांना आज दि.११ जुलै रोजी मेहकर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली़ तपासा दरम्यान अपहरण करण्यात आलेल्या पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीतील दिलीप भिकाजी इंगळे यांची हत्या करण्यात आल्याचे समाेर आले आहे.

अटकेतील आराेपींची कसून चाैकशी

अटकेत असलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे़ काेणत्या कारणावरून दिलीप भिकाजी इंगळे याचा खून करण्यात आला? आणि तो खून कोणी केला? हे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी पुढील अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजिनाथ मोरे व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Web Title: Murder of a kidnapped youth from a money-making gang Five arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.