थरारक! ऐन लग्न सोहळ्यात घडला रक्तपात; नवरदेवाला अटक, ८ फरार, नवरीचा लग्नास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 08:29 AM2022-05-27T08:29:31+5:302022-05-27T08:30:18+5:30

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संगमचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. संगम यादवचं वर्षभरापूर्वी लग्न झाले होते.

Murder of a youth during a wedding ceremony, one arrested at UP | थरारक! ऐन लग्न सोहळ्यात घडला रक्तपात; नवरदेवाला अटक, ८ फरार, नवरीचा लग्नास नकार

थरारक! ऐन लग्न सोहळ्यात घडला रक्तपात; नवरदेवाला अटक, ८ फरार, नवरीचा लग्नास नकार

googlenewsNext

गोरखपूर – उत्तर प्रदेशच्या गोरखपूर इथं एका गावात लग्न सोहळ्यातच रक्तपात घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली. लग्नाच्या विधी सुरू असतानाच गावातील युवक संगम यादवची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. या हत्येचा आरोप नवरदेवाच्या घरच्यांवर मामा आणि त्याच्या मुलावर लावण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गावात प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. युवकाची मारहाण करून हत्या केल्यानं आसपासच्या गावामध्येही दहशत पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील सुभाष चौहान यांचा मुलगा इंदल चौहान याचा लग्नसोहळा होता. या लग्ना समारंभात संगमही उपस्थित होता. यावेळी जेवणानंतर हात धुण्याच्यावेळी पाणी नवरदेवाच्या मामाच्या अंगावर पडले. त्यावरून संगम आणि मामा यांच्यात वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झाले. बुधवारी संध्याकाळी ७ वाजता इंदल चौहानचं वऱ्हाड निघालं असताना संगमदेखील हजर होता. त्यावेळी नवरदेवाचा मामा आणि त्याचा मुलाने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने संगमला लाठी-काठीने मारहाण करून त्याची हत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संगमचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. संगम यादवचं वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. संगमच्या हत्येनंतर वऱ्हाड लग्नासाठी रवाना झाले. मृत संगमच्या वडिलांनी याबाबत तक्रार नोंदवली असून पोलिसांनी नवरदेवासह ९ लोकांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पण लग्नस्थळी पोहचलेल्या मुलीकडच्या नातेवाईकांनी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी लग्नाला नकार दिला. पोलिसांनी विवाहस्थळी पोहचून इंदल चौहानला अटक केली आहे.

त्यासोबतच पोलीस नवरदेवाचे वडील सुभाष चौहान, बहिण संध्या, निशा, आई भगवंता, मामा रामकुमार चौहान, श्याम सुंदर, बसंत आणि मोतीलाल या आरोपींचा शोध घेत आहे. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात हत्या आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे. याबाबत गोरखपूर एसएसपी डॉ. विपिन ताडा म्हणाले की, झंगहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात लग्नासमारंभात दोन गटात वाद झाला. ज्याठिकाणी गावातील युवकाची मारहाण करून हत्या करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. जखमी युवकाला उपचारासाठी हॉस्पिटलला नेले. तिथे युवकाला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.   

Web Title: Murder of a youth during a wedding ceremony, one arrested at UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.