Crime News: आईच्या प्रियकराकडून मुलीची हत्या, अपघाती मृत्यूचा बनाव तपासात झाला उघड, आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 09:34 AM2022-02-05T09:34:30+5:302022-02-05T09:36:23+5:30

Crime News: भाईंदर पश्चिमेकडील दोन वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलीच्या आईच्या प्रियकरास अटक केली.

Murder of daughter by mother's lover, accidental death revealed in investigation, accused arrested | Crime News: आईच्या प्रियकराकडून मुलीची हत्या, अपघाती मृत्यूचा बनाव तपासात झाला उघड, आरोपी अटकेत

Crime News: आईच्या प्रियकराकडून मुलीची हत्या, अपघाती मृत्यूचा बनाव तपासात झाला उघड, आरोपी अटकेत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मीरा रोड : भाईंदर पश्चिमेकडील दोन वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलीच्या आईच्या प्रियकरास अटक केली. मुलीचा अडसर दूर करण्यासाठी तिची हत्या करून अपघाती मृत्यू असल्याचे भासविण्याचा त्याने केलेला बनाव उघडकीस आला . 
मुर्धा गावातील राम मंदिर येथे पूजा वाघ ही आपल्या दोन वर्षाची मुलगी सोनालीसह गेल्या दोन वर्षांपासून प्रियकर आदिल खान(२२)सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. पूजाचा पहिल्या पतीसोबत प्रेमविवाह झाला होता व त्याच्यापासून दोन मुली आहेत. दोघांचे पटत नसल्याने मोठी मुलगी वडिलांसोबत राहते तर पूजा लहान मुलीला घेऊन वेगळी राहात होती.  ती कॅटरिंगचे काम करते  तर आदिल हा रिक्षा चालवायचा. ती कामावर गेली की आदिल सोनालीचा सांभाळ करायचा. परंतु सोनाली सारखी रडते म्हणून आदिलने पूजाकडे तक्रार केली होती. 
भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांनी आदिल याला अटक केली. 
पूजा आणि आपल्यामध्ये सोनाली अडसर ठरत होती. त्यामुळे तिचा खून केल्याचे आदिलने कबूल केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

तोंड, नाक दाबल्याने कोंडला श्वास 
बुधवारी भाईंदर पोलीस ठाण्यात सोनाली हिचा घरी अपघाती मृत्यू झाल्याची खबर पोलिसांना मिळाली.  सोनाली खेळाताना गॅस शेगडीवर पडली आणि नाकातोंडास मार लागल्याने त्याने तिला डॉक्टरकडे नेले.  डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यावर आदिल तेथून पळाला. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जोशी रुग्णालयात पाठविला असता मुलीचे तोंड व नाक दाबल्याने तिचा श्वास कोंडल्याचे तसेच डोक्याच्या मागे जखम असल्याचे निष्पन्न झाले. 

Web Title: Murder of daughter by mother's lover, accidental death revealed in investigation, accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.