लग्नाचा दबाव टाकल्याने प्रेयसीची हत्या; बहिणीलाही ठार केलं, एका कॉलवरून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 02:09 PM2023-06-04T14:09:53+5:302023-06-04T14:10:20+5:30
दिवांशु आणि तरुणीमध्ये १ जून रोजी संभाषण झाले होते. खागा येथील नातेवाईकाच्या घरी गेल्याचे मुलीने सांगितले
फतेहपूर - प्रयागराज-कानपूर महामार्गावरील कटोघन पेट्रोल टाकीजवळ २ बहिणींची निर्घृण हत्या केल्याचा खुलासा पोलिसांनी २४ तासांत केला. कौशांबी येथील रहिवासी असलेल्या मारेकऱ्याला अटक करण्यात आली आहे. प्रेमी युगुल एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागले. तरुणी तिच्या प्रियकरावर लग्नासाठी दबाव टाकत होती. या वादात प्रियकराने तरुणीची हत्या केली.
या घटनेवेळी बचावासाठी आलेल्या प्रेयसीच्या बहिणीचीही हत्या करून तो फरार झाला होता. कौशांबी जिल्ह्यातील कडाधाम पोलीस स्टेशन हद्दीतील इमामाली येथील चक मजरे अलीपूर जीता येथील दिवांशु उर्फ दिशू (२३) याला पोलीस पथकांनी अटक केली आहे. एसपी राजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, दिवांशुचे सुलतानपूर घोष पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील २६ वर्षीय स्थानिक तरुणीसोबत सुमारे दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
मुलीच्या वहिनीला याची माहिती होती. ही मुलगी त्वचेशी संबंधित आजाराने त्रस्त होती. तिचा आजार लग्नात अडथळा ठरला. कुटुंबातील महिलांची इच्छा होती की तिने तरुणाशी लग्न करावे. दोघेही लग्नासाठी तयार होते. काही दिवसांपासून मुलगी दिवांशुवर लग्नासाठी दबाव टाकत होती. दिवांशुला भीती वाटत होती की ती मुलगी त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणाशी तरी बोलत आहे. तसेच दिवांशु इतरत्र बोलत असल्याचा संशयही तरुणीला आला.
दिवांशु आणि तरुणीमध्ये १ जून रोजी संभाषण झाले होते. खागा येथील नातेवाईकाच्या घरी गेल्याचे मुलीने सांगितले. तिथे दिवांशुला येण्यास सांगितले. दिवांशु रात्री ८.२० च्या सुमारास दुचाकीवरून कार्यक्रमस्थळी पोहोचला. त्याने मुलीला फोन करून बोलावले. रात्र झाल्यामुळे तरुणीने आपल्या बहिणीला (16) सोबत नेले. दिवांशुनेही बहिणीला घेऊन येण्यास नकार दिला, मात्र मुलीला ते मान्य नव्हते. दोघींना ढाब्यावर जेवण आणि आईस्क्रीम खायला देण्याच्या बहाण्याने दिवांशु दुचाकीने काटोघन पेट्रोल पंपाजवळ पोहोचला. घटनास्थळाच्या काही अंतरावर दुचाकी थांबवली. तो मुलीला घेऊन तलावाच्या काठी गेला आणि बोलू लागला. लग्नाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
रागाच्या भरात तरुणीने दिवांशुला शिवीगाळ केली. दिवांशुने थप्पड मारताच मुलगी जमिनीवर पडली. गळा दाबला त्यानंतर तिच्या डोके व चेहरा विटेने ठेचून मारला. आवाज ऐकून मुलीची बहिण धावतच पोहोचली. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. देवांशूने मुलीला प्रत्यक्षदर्शी समजून तिचा गळा आवळून व विटेने वार करून तिचीही हत्या केली. दोघांचे मृतदेह एकमेकांच्या वर ठेवले आणि झुडपात लपवून पलायन केले.
या खून प्रकरणात पोलीस एका फोनवरून मारेकऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. आरोपीने मुलीला मार्गातून हटवण्याचे आधीच ठरवले होते. त्यासाठी त्याने मित्राच्या मोबाईलवरून मृताच्या वहिनीच्या नंबरवर कॉल केला होता. हत्येनंतर मृताचा कीपॅड फोनही सोबत घेऊन वाटेत कुठेतरी फेकून दिला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये दोघींना १२ हून अधिक गंभीर जखमा झाल्या होत्या. युवती वहिनीचा मोबाईल घेऊन घरातून निघाली होती. हत्येच्या ठिकाणी मोबाईल सापडला. त्यातील सीडीआर तपासला असता लोकेशन ट्रेस करून पोलिसांनी आरोपीच्या मित्राला उचलले. त्यानंतर मित्राच्या मदतीने पोलिसांनी आरोपी दिवांशुला गाठले.