मोलकरणीच्या प्रेमात पडलेल्या करोडपती वृद्धाचा मृत्यू; लेकाने केला गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 02:04 PM2023-06-17T14:04:50+5:302023-06-17T14:20:51+5:30
मोलकरीण सीमाने हळूहळू शंकरलालला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आपल्या मुलांना शंकरलालच्या घरात ठेवलं.
उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात मोलकरणीवर प्रेम करणाऱ्या करोडपती वृद्धाचा मृतदेह त्याच्या खोलीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. बँकेतून निवृत्त झालेले 72 वर्षीय शंकरलाल कुशवाह हे त्यांच्या कुटुंबाशिवाय दुसऱ्या घरात राहत होते. मृत शंकरलाल कुशवाह यांनी काही वर्षांपूर्वी एका महिलेला आपल्या घरात मोलकरीण म्हणून ठेवलं होतं. झाशी शहराच्या सीमेवर असलेल्या डेली गावात ही घटना घडली आहे.
करोडपती वृद्धाच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, वडिलांनी कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी, अगदी आईशीही संबंध तोडले होते आणि ते कुटुंब सोडून दुसऱ्या घरात राहू लागले होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी सीमा नावाची मोलकरीण घरकामासाठी ठेवली. वडिलांकडे भरपूर पैसे असल्याचे पाहून सीमाने त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याचे घर व पैसे तिच्या नावावर घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकरलाल हे बँकेत सहाय्यक व्यवस्थापक होते. बँकेत रुजू होण्यापूर्वी ते एअरफोर्समध्ये काम करत होते. तेथून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी प्रथम टपाल खात्यात नोकरी केली आणि त्यानंतर ते बँकेत रुजू झाले. बँकेच्या नोकरीत 2008 साली व्हीआरएस घेऊन ते घरी राहू लागला. त्यांनी घरीच स्वतःची संस्था उघडून दिव्यांग आणि गरिबांची सेवा सुरू केली
शंकरलाल यांच्या पत्नीही रेल्वेत कामाला होत्या, त्यामुळे शंकरलाल यांचा मुलगा सुमित व मुलगी सुप्रिया हे दोघे कामावर गेल्यावर घरात एकटेच राहत असत, त्यामुळे घरातील इतर सदस्य बाहेरच्या व्यक्ती घरात येण्यास आक्षेप घेत. या कारणावरून कुटुंबीयांनी शंकरलाल यांच्यावर संस्था बंद करण्यासाठी दबाव टाकला, मात्र ते तयार झाले नाहीत आणि एके दिवशी भांडणानंतर ते कुटुंबापासून वेगळे राहू लागले.
कुटुंबाशी असलेले संबंध तोडून शंकरलाल झाशीच्या डेली गावात रॉयल सिटीच्या मागे बांधलेल्या एका राहू लागले आणि त्यांनी सीमा नावाच्या एका मोलकरणीला घरगुती कामासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन कामावर ठेवले. मोलकरीण सीमाने हळूहळू शंकरलालला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आपल्या मुलांना शंकरलालच्या घरात ठेवलं आणि स्वतः शंकरलालची पत्नी म्हणून राहू लागली, असा आरोप आहे.
घटनास्थळी पोहोचलेले झाशीचे एसएसपी राजेश एस यांना हे प्रकरण हत्येचे असल्याचे आढळून आल्याने त्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी झाशीचे एसपी सिटी ज्ञानेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तयार केले आहे. त्यांनी सांगितले की कुटुंबातील एका मोलकरणीवर संशय आहे, जे अद्याप फरार आहे. त्याची संपूर्ण माहिती गोळा केली जात आहे. खून प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.