अनैतिक संबंधातूनच ‘त्या’ प्राध्यापकाचा खून; पत्नीसह वनरक्षकाला घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 08:21 PM2022-08-04T20:21:49+5:302022-08-04T20:22:29+5:30

Extra Marital Affair : तीन दिवसात लावला खुनाचा छडा

Murder of 'that' professor due to immoral relationship; The forest guard along with his wife were taken into custody | अनैतिक संबंधातूनच ‘त्या’ प्राध्यापकाचा खून; पत्नीसह वनरक्षकाला घेतले ताब्यात

अनैतिक संबंधातूनच ‘त्या’ प्राध्यापकाचा खून; पत्नीसह वनरक्षकाला घेतले ताब्यात

googlenewsNext

उमरखेड (यवतमाळ): उमरखेड येथील भाऊसाहेब माने कृषी विद्यालयातील प्राध्यापक सचिन देशमुख यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत दिग्रस तालुक्यातील सिंगद येथे आढळला होता. सदर प्राध्यापकाचा खून झाल्याचे शवचिकित्सा अहवालातून उघड झाले होते. गुरुवारी या प्रकरणी वनपाल असलेली पत्नी धनश्री देशमुखसह वनपाल शिवम बचके यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


प्रा. सचिन वसंतराव देशमुख यांचा मंगळवारी सकाळी पुसद-दिग्रस मार्गावर पुलाखाली संशयास्पद स्थितीत  मृतदेह आढळला होता. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. प्रा. देशमुख हे शुक्रवारी अकोला जिल्ह्यातील आकोट येथे वनपाल म्हणून नोकरीस असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी निघाले होते. मात्र त्यांचा दिग्रस तालुक्यातील सिंगद येथे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान बुधवारी शवचिकित्सा अहवालातून प्रा. सचिन देशमुख यांचा गळा आवळून खून केल्याचे पुढे आले होते.

त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासावर लक्ष केंद्रीत केले. तसेच खबऱ्यांच्या माध्यमातून प्राध्यापकांबद्दल माहितीही गोळा केली. या प्रकरणाचा तपास सायबर टीम, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून करण्यात येत होता. या पथकाने दिग्रस, उमरखेड आणि आकोट येथे लक्ष केंद्रीत केले होते. शवचिकित्सा अहवालातून गळा आवळून खून झाल्याचे पुढे आल्यानंतर तपास चक्रे गतीमान झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिग्रस पोलीस, उमरखेड पोलीस, एलसीबीसह सायबर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आकोटमधील परतवाडा येथे तपासाला गती दिली. अखेर अनैतिक संबंधातून सचिनचा खून झाल्याचे पुढे आले. या प्रकरणी वनपाल शिवम चंदन बचके (३३) रा. आकोट आणि प्रा. सचिन देशमुख यांची पत्नी वनपाल धनश्री देशमुख (२८) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर हे करीत आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: Murder of 'that' professor due to immoral relationship; The forest guard along with his wife were taken into custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.