धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा खून; पतीला केले अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2023 11:06 PM2023-03-11T23:06:33+5:302023-03-11T23:07:01+5:30
मूळचे सांगली येथील असलेले राठोड दाम्पत्य सध्या हिंजवडी येथे वास्तव्यास आहे.
पिंपरी : धारदार शस्त्राने वार करून एकाने पत्नीचा खून केला. हिंजवडी फेज तीन येथे शनिवारी (दि. ११) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सविता नामदेव राठोड (वय ३०), असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी संशयित आरोपी पती नामदेव राठोड (वय ३५, मूळ रा. सांगली, सध्या रा. हिंजवडी) याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे सांगली येथील असलेले राठोड दाम्पत्य सध्या हिंजवडी येथे वास्तव्यास आहे. आरोपी नामदेव याला दारूचे व्यसन आहे. शनिवारी रात्री त्याने दारूच्या नशेत पत्नी सविता हिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सविता यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.