धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या, मेहकर शहरातील घटना
By संदीप वानखेडे | Updated: May 28, 2024 18:49 IST2024-05-28T18:48:59+5:302024-05-28T18:49:44+5:30
शहरातील माळीपेठ येथील राजू नामदेव नन्नवरे या युवकाची जानेफळ रस्त्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.

धारदार शस्त्राने वार करून युवकाची हत्या, मेहकर शहरातील घटना
मेहकर : शहरात २२ वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने वार करीत त्याची हत्या केल्याची घटना २७ मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी संशयित चार आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. आकाश राजू नन्नवरे रा.माळीपेठ मेहकर असे मृतक युवकाचे नाव आहे.
शहरातील माळीपेठ येथील राजू नामदेव नन्नवरे या युवकाची जानेफळ रस्त्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी राजू नामदेव नन्नवरे यांनी दिलेल्या फिर्यादीत गणेश किशोर थाबडे रा.माळीपेठ याने आकाश नन्नवरे यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. त्यावरून मेहकर पोलिसांनी गणेश थाबडे यांच्यासह दोन ते तीन जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मेहकर शहरात युवकाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच, सिंदखेडराजाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कदम आणि मेहकरचे ठाणेदार राजेश शिंगटे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.