अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिस ठाण्यात जमाव, सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

By सचिन धर्मापुरीकर | Published: July 22, 2024 03:35 PM2024-07-22T15:35:30+5:302024-07-22T15:36:00+5:30

याप्रकरणी सहा जणांविरूद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात सोमवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Murder of youth due to immoral relationship, mob at police station, case registered against six people | अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिस ठाण्यात जमाव, सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिस ठाण्यात जमाव, सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

कोपरगाव (जि. अहमदनगर) : महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरूणाचा खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी सहा जणांविरूद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात सोमवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मोठा जमाव पोलिस स्टेशनसमोर जमला होता. अप्पर पोलिस अधिक्षक दत्तात्रय कलबुर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांनी जमावाला शांत केले. सोहेल हारून पटेल (वय २८, रा. आयशा कॉलनी, कोपरगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. 

मयत सोहेलचा भाऊ शाहरुख हारून पटेल (वय २५) याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, सोहेल पटेल याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून आरोपी मच्छिंद्र सोनवणे ऊर्फ मच्छू, स्वप्नील गायकवाड, महेश कट्टे, विकी परदेशी, योगेश जाधव ऊर्फ पोंग्या व विकीचा मित्र (सर्व रा. कोपरगाव) यांनी घरी येऊन सोहेलला एमएच १५ ई ४७९५ क्रमांकाच्या वाहनातून घेऊन गेले. 

कर्मवीर नगरमध्ये जावेद जमशेर शेख यांच्या शेती प्लॉटमध्ये नेऊन लाकडी दांड्याने, चाकुने, खिळे असलेल्या बांबूने मारहान केली. यात साहेलाचा मृत्यू झाला. अशा आशयाच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात बीएनएस १०३ (१), ११८ (१) (२), १४०(१), १८९ (१), १९१(३), १९१ (२), १९० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस ठाण्यात जमाव
खुनाच्या घटनेनंतर सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलिस ठाण्यात मोठा जमाव जमला. आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी श्रीरामपुर येथील अतिरिक्त पोलीस अधिक्षक दत्तात्रय दत्तात्रय कलबुर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांनी तीन आरोपी अटक केले असून उर्वरित आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल असे सांगितले. त्यानंतर जमाव पांगला.

Web Title: Murder of youth due to immoral relationship, mob at police station, case registered against six people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.