मोबाईल चार्जिंगवरुन झालेल्या वादतून  तरुणाची हत्या, फरार आरोपीला अडीच महिन्यांनी अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 09:16 PM2022-06-02T21:16:11+5:302022-06-02T21:19:06+5:30

Murder Case : वर्तकनगर पोलिसांची कारवाई; मोबाईल चार्जिंगवरुन झाला होता वाद

Murder of youth in a dispute over mobile charging, absconding accused arrested after two and a half months | मोबाईल चार्जिंगवरुन झालेल्या वादतून  तरुणाची हत्या, फरार आरोपीला अडीच महिन्यांनी अटक

मोबाईल चार्जिंगवरुन झालेल्या वादतून  तरुणाची हत्या, फरार आरोपीला अडीच महिन्यांनी अटक

googlenewsNext

ठाणे: मोबाईलच्या चार्जिंगवरुन झालेल्या वादातून सुमित राऊत (२२, रा. शास्त्रीनगर, ठाणे) याची हत्या करुन पसार झालेल्या राज वंजारी याला वर्तकनगर पोलिसांनी नुकतीच अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी गुरुवारी दिली. त्याला १० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.


शास्त्रीनगर येथील नरडे चाळीतील इलेक्ट्रीक केबलचा व्यवसायिक सुमित राऊत याच्या छाती आणि पाेटावर चाकू आणि गुप्तीचे वार करुन राज याच्यासह पाच जणांनी १६ मार्च २०२२ रोजी हत्या केली होती. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांच्या पथकाने अभिषेक केसरकर (१९, रा. लाेकमान्यनगर, ठाणे), अमाेल उर्फ अमगी बनसाेडे (१८,रा. लाेकमान्यनगर, ठाणे) आणि उत्कर्ष बनसाेडे (१९ ) यांच्यासह चाैघांना १७ मार्च रोजी केली होती.

भावाच्या पत्नीला पळवून नेले इंदूरला, पोलिसांना पाहून मारली तिसऱ्या मजल्यावरून उडी अन्...

आरोपींपैकी एक अल्पवयीन होता. तर मुख्य आरोपी वंजारी हा हत्या झाल्यानंतर पसार झाला होता. तो आपले नाव बदलून टिटवाळा भागात वास्तव्य करीत असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वंजारी याला ३१ मे २०२२ रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध खूनाचे प्रयत्न केल्याचे दोन, खूनाचा एक असे चार गुन्हे वेगवेगळया पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

Web Title: Murder of youth in a dispute over mobile charging, absconding accused arrested after two and a half months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.