जुन्या वादातून जळगावात तरुणाचा खून, संशयित पोलिसांच्या ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 11:30 PM2022-07-23T23:30:15+5:302022-07-23T23:31:07+5:30

ही घटना शनिवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Murder of youth in Jalgaon due to old dispute, suspect in police custody | जुन्या वादातून जळगावात तरुणाचा खून, संशयित पोलिसांच्या ताब्यात 

जुन्या वादातून जळगावात तरुणाचा खून, संशयित पोलिसांच्या ताब्यात 

Next

जळगाव : शहरातील खुनाचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. दोन दिवसापूर्वी शाहूनगरातील जळकी मील भागात खून झाल्याची घटना ताजी असताना शनिवारी पुन्हा हरिविठ्ठल नगर परिसरात एका तरुणाचा डोक्यात कोयता मारुन खून करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

दिनेश  काशिनाथ भोई (वय २८ रा. हरिविठ्ठल नगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.तो रिक्षाचालक होता. शनिवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगरातील गणपती मंदिर परिसरातल्या बाजार रस्त्यावर जुन्या वादातून दिनेश याच्या घरासमोर राहणारा विठ्ठल तुकाराम पाटील-हटकर याने  त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केला. 

ही घटना दिनेशच्या भावाला कळताच त्याने दिनेश याला रिक्षात टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. मात्र,डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.भर रस्त्यावर खून झालेला असल्याने हरिविठ्ठल नगरात तणाव निर्माण झाला होता.रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हरिविठ्ठल नगरातील नागरिकांनी गर्दी केली होती. 

संशयित पोलिसांच्या ताब्यात 
दरम्यान, संशयित आरोपी विठ्ठल पाटील  हा घटनेनंतर हरिविठ्ठल नगरात फिरत होता.  ही माहिती एलसीबीचे प्रीतम पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याची कसून चौकशी सुरु होती.

Web Title: Murder of youth in Jalgaon due to old dispute, suspect in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.