राजस्थानमध्ये पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबलची हत्या करणारे तिघेजण पुण्यातून जेरबंद   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 02:28 PM2018-10-14T14:28:20+5:302018-10-14T14:35:02+5:30

राजस्थानमधील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आणि हवालदार यांची हत्या करुन फरार झालेल्या तिघांना गुन्हे शाखेने पुण्यात रात्रभर सर्च आॅपरेशन करुन अटक केली़.

murder of police inspector and constable in Rajasthan, Three people arrest from Pune | राजस्थानमध्ये पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबलची हत्या करणारे तिघेजण पुण्यातून जेरबंद   

राजस्थानमध्ये पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबलची हत्या करणारे तिघेजण पुण्यातून जेरबंद   

googlenewsNext

पुणे - राजस्थानमधील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आणि हवालदार यांची हत्या करुन फरार झालेल्या तिघांना गुन्हे शाखेने पुण्यात रात्रभर सर्च आॅपरेशन करुन अटक केली़.  विभोरसिंह, साकेतसिंह आणि रामपाल गिरीधारीलाल रनैवाल अशी त्यांची नावे आहेत. 

याबाबतची माहिती अशी, पोलीस निरीक्षक मुकेश कानुनगो आणि पोलीस काँस्टेबल रामप्रकाश अशी शहीद झालेल्या पोलिसांची नावे आहेत.  कुप्रसिद्ध गुंड अजय चौधरी व त्याची टोळी फतेहपूर येथे असल्याची माहिती मुकेश कानुनगो यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गेल्या शनिवारी रात्री बेसवा गावाजवळ त्यांचा पाठलाग केला. मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस व गुंड समोरासमोर आल्यावर त्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस निरीक्षक आणि पोलीस काँस्टेबल यांना गोळ्या लागून त्यात ते शहीद झाले होते़ यामुळे संपूर्ण राजस्थानामध्ये मोठी खळबळ उडाली होती.

राजस्थान पोलिसांनी या टोळीला पकडण्यासाठी संपूर्ण ताकद लावली आहे. त्यांचे काही जण पुण्यात असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार राजस्थान पोलिसांचे पथक शनिवारी पुण्यात आले होते़ राजस्थानच्या महासंचालकांनी महाराष्ट्राचे महासंचालक दत्ता पडसलगीर यांना याची माहिती दिली़ त्यांनी पोलीस आयुक्त डॉ़ के व्यंकटेशम यांना कळविले. 

गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथक, खंडणी विरोधी पथक यांची शनिवारी सायंकाळी पथके तयार करण्यात आली़. राजस्थान पोलिसांनी संशयित गुंडांचे फोटो पुणे पोलिसांना दिले होते़ त्यांच्या मोबाईलवरुन लोकेशन घेण्यात आले़ ते बावधन येथील निघाले़ त्यानुसार, संपूर्ण बावधन परिसरात रात्री शोध मोहिम सुरु करण्यात आली. तेथील विविध इमारतीत राहणा-या लोकांची माहिती घेण्यात येऊ लागली़ काही इमारतींची माहिती घेतल्यावर एका इमारतीत ११ जण रहात आल्याचे आढळून आले.  त्या सर्वांची तपासणी करण्यास सुरुवात केली.  त्यांचे फोटो पोलिसांकडे होते़ ते तिघे त्या आढळून आले़. त्यांना ताब्यात घेऊन पोलीसी हिसका दाखविल्यानंतर त्यांनी त्यांनी गुन्हा कबुल केला. त्यानंतर पहाटे त्यांना राजस्थान पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

पोलीस आयुक्त डॉ़ के़. व्यंकटेशम, अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, राजेंद्र कदम व त्यांच्या पथकांनी ही कामगिरी केली़.

Web Title: murder of police inspector and constable in Rajasthan, Three people arrest from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.