जमिनीच्या आर्थिक वादावरून मित्रानेच डोक्यात दगड घालून केला खून; राजगुरुनगर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 04:19 PM2021-01-05T16:19:41+5:302021-01-05T16:23:46+5:30

राहूल सावंत व वाडेकर या जिवलग मित्रांनी एका जमिनीच्या व्यवहारात पैसे लावले होते.

The murder was committed by a close friend by throwing a stone at his head over a dispute over land money | जमिनीच्या आर्थिक वादावरून मित्रानेच डोक्यात दगड घालून केला खून; राजगुरुनगर येथील घटना

जमिनीच्या आर्थिक वादावरून मित्रानेच डोक्यात दगड घालून केला खून; राजगुरुनगर येथील घटना

Next

राजगुरुनगर: शिरोली (ता. खेड) येथे जमिनीच्या पैशाच्या वादावरून जिवलग मित्रानेच मित्राचा डोक्यात दगड घालून खून केला आहे. राहुल बाबाजी सावंत (वय २२ रा. शिरोली ता. खेड ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेबाबत दोन आरोपीना पोलिसांनी १२ तासात जेरबंद केले आहे. हेमंत वाडेकर (वय २५, रा. शिरोली ता. खेड,),शिवा कुडेकर (वय २६ रा. चव्हाण मळा, पाबळ रोड) अशा दोन आरोपीना ताब्यात घेतले आहे. 

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल सांवत व हेमंत वाडेकर हे जिवलग मित्र होते. त्यांनी जमिनीच्या व्यवहारात पैसे लावले होते. राहूल सावंत हा वारंवार वाडेकर यांच्याकडे पैशाची मागणी करत होता. सोमवारी (दि. ४ ) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास राहुल व हेमंत वाडेकर (वय २५, रा. शिरोली ता. खेड,) शिवा भाऊ कुडेकर (वय २६ रा. चव्हाण मळा पाबळ रोड, व सुनिल मोहन पवार रा. रेटवडी (ता खेड ) हे सर्व जण राजगुरुनगर शहरालगत असणाऱ्या ढुम्या डोंगरांच्या पायथ्याशी दारू पिण्यास गेले होते. दारू पिल्यानंतर जमिनीच्या पैशावरुन वाद झाला. या कारणावरुन राहूल याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार स्वप्नील गाढवे, शेखर भोईर, सचिन जतकर, निखिल गिरीगोसावी यांनी आरोपी हेंमत वाडेकर, शिवा कुडेकर या दोघांना ताब्यात घेतले आहे. सुनील पवार हा फरार झाला असुन पोलिस त्याचा शोध घेत आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सतिश गुरव करत आहे.

Web Title: The murder was committed by a close friend by throwing a stone at his head over a dispute over land money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.