गुन्हेगारी शिखराच्या पायरीवर; उसनवारीतून ‘मर्डर’ केला ६ आरोपींवर २१ गुन्हे दाखल

By नरेश रहिले | Published: January 10, 2024 08:05 PM2024-01-10T20:05:18+5:302024-01-10T20:05:41+5:30

गुन्हेगारी जगतात शिखराच्या पायरीवर; दोन्ही गटातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी

'Murder' was committed from Usanwari, 21 cases were registered against 6 accused | गुन्हेगारी शिखराच्या पायरीवर; उसनवारीतून ‘मर्डर’ केला ६ आरोपींवर २१ गुन्हे दाखल

गुन्हेगारी शिखराच्या पायरीवर; उसनवारीतून ‘मर्डर’ केला ६ आरोपींवर २१ गुन्हे दाखल

गोंदिया : क्षुल्लक-क्षुल्लक कारणातून मारहाण, चोरी करणे, छेड काढणे या गुन्ह्यात समाविष्ट असलेल्या लोकांचा ६ जानेवारी रोजी वाद झाला. या वादात मनीष ऊर्फ ईश्वर भालाधरे (३०,रा. आंबेडकर चौक, कुडवा) या तरुणाला कुडवा येथील इंजिनिअरिंग कॉलेजजवळ खून करण्यात आला. या प्रकरणात खून करणाऱ्या पाच जणांवर खुनाचा गुन्हा तर त्या मारहाणीत दुसऱ्या गटानेही काठीने बेदम मारहाण करून एका १६ वर्षाच्या मुलाला गंभीर जखमी केले. या प्रकरणातील ६ आरोपींवर तब्बल २१ गुन्हे दाखल आहेत.

मृतक मनीष ऊर्फ ईश्वर भालाधरेसह चौघांनी १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला लकी रेस्टॉरंट येथे अश्लील शिविगाळ करीत काठीने त्याला बदेम मारहाण केली. तुषार हंसराज हट्टेवार (१६) हा पोहे खात असतांना त्याला मृतक मनीष उर्फ ईश्वर भालाधरे (३०), प्रवीण उर्फ लक्की राजकुमार मेश्राम (२३), राहुल दिनेश बरेले (२४) व प्रवेश नरेंद्र मेश्राम (२७) सर्व रा. कुडवा यांनी शिविगाळ करीत काठीने व लाथाबुक्यांनी मारून गंभीर जखमी केले. या घटने संदर्भात तुषार हट्टेवार यांच्या तक्रारीवरून आरोपींवर ८ जानेवारी रोजी भादंविचे कलम ३२४, ३२३, २९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक फौजदार बनकर करीत आहेत.

मृतक मनिषवरही तिन गुन्हे
या घटनेतील मृतक मनीष ऊर्फ ईश्वर भालाधरे (३०,रा. आंबेडकर चौक, कुडवा) याच्यावर सन २०१९ मध्ये कलम ४५७, ३८० अंतर्गत गुन्हा दाखल आहे. सन २०२३ मध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अंतर्गत गुन्हा आहे. तिसरा गुन्हा त्याच्या मृत्यूनंतर ८ जानेवारी रोजी दाखल करण्यात आला.

राहूल बरेलेवर सर्वाधीक गुन्हे

राहुल दिनेश बरेले (२४) याच्यावर सर्वाधीक ८ गुन्हे दाखल आहेत. सन २०१२ मध्ये चोरीचा गुन्हा, सन २०१५ मध्ये दोन गुन्हे दाखल असून एक गुन्हा चोरीचा तर दुसरा मारहाण करून दुखापत केल्याचा गुन्हा दाखल आहे. सन २०१६ मध्ये मारहाण केल्यानमुळे कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सन २०१८ मध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अंतर्गत गुन्हा दाखल, सन २०१९ मध्ये कलम ४५७, ३८०, सन २०२० मध्ये विनयभंग करून ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंद आहे. तर खुन होण्यापूर्वी तुषारला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रवीणवर विनयभंग, चोरी व मारहाणचे गुन्हे

प्रवीण उर्फ लक्की राजकुमार मेश्राम (२३) या आरोपीवर सन २०१६ ला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सन २०१९ मध्येही घरफोडी केल्याचा गुन्हा दाखल आहे. सन २०२० मध्ये त्याच्यावर विनयभंग करून ठार करण्याची धमकी दिल्याचा गुन्हा व आता तुषारला मारहाण केल्याचाही गुन्हा दाखल असे चार गुन्ो दाखल आहेत.

पाच गुन्ह्यात प्रवेश

या प्रकरणातील आरोपी प्रवेश नरेंद्र मेश्राम (२७) याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत. सन २०१६ मध्ये घरफोडी, सन २०१९ मध्ये घरफोडी व मारहाण करून ठार करण्याची धमकी देणे, सन २०२२ ला मुंबई जुगारबंदी कायदा कलम १२ अ अंतर्गत गुन्हा व आता तुषारला मारहाण प्रकरणातील गुन्हा असे पाच गुन्हे दाखल आहेत.

मनिषच्या दोन मारेकऱ्यांवरही पूर्वीचे गुन्हे

मनिष भालाधरेचा खून करणारे पवन संतोष मानकर याच्यावर सन २०१९ मध्ये कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत व आता खुनाचा गुन्हा असे दोन गुन्हे तर संतोष मानकर याच्यावर सन २००९ मध्ये मारहाण करून दुखापत करणे, सन २०१२ मध्ये मारहाण करून दुखापत करणे व ठार करण्याची धमकी देणे, सन २०१९ मध्ये मारहाण करून दुखापत करणे व ठार करण्याची धमकी देणे व आताचा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 'Murder' was committed from Usanwari, 21 cases were registered against 6 accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.