पत्नीची हत्या; पतीला अटक, नरबळीचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 05:56 AM2020-09-04T05:56:53+5:302020-09-04T05:56:59+5:30
बसौदा (जिल्हा सिंग्राउली) खेड्यात हा प्रकार बुधवारी पहाटे घडला. मृत महिलेच्या दोन मुलांनी पोलिसांना या प्रकाराबद्दल सांगितल्यानंतर त्याला अटक झाल्याचे जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रदीप शेंडे यांनी सांगितले.
सिंग्राउली (मध्यप्रदेश) : देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी पतीने (५०) स्वत:च्या पत्नीचा (४५) शिरच्छेद करून मृतदेह घरात पुरल्याच्या संशयावरून त्याला गुरुवारी अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
बसौदा (जिल्हा सिंग्राउली) खेड्यात हा प्रकार बुधवारी पहाटे घडला. मृत महिलेच्या दोन मुलांनी पोलिसांना या प्रकाराबद्दल सांगितल्यानंतर त्याला अटक झाल्याचे जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रदीप शेंडे यांनी सांगितले.
पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने तिचे डोके आणि धड घरात ज्या खोलीत पूजा केली होती तेथे पुरले व तेथून फरार झाला, असे शेंडे म्हणाले. दोन मुलांनी आमच्या वडिलांनी कोणत्या तरी देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आमच्या आईची हत्या केल्याचा आरोप केला. काही दिवसांपूर्वी त्याने देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी बोकडही ठार मारून त्याला पूजेच्या खोलीत पुरले होते. मुलांनी दिलेल्या निवेदनावरून हे प्रकरण नरबळीचे दिसते, असेही शेंडे म्हणाले.