हत्येच्या प्रकरणातील आरोपी महिलेचा केला खून, नंतर गळा कापून दलित नेत्याच्या फोटोखाली ठेवले डोके 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 04:14 PM2021-09-23T16:14:49+5:302021-09-23T16:15:35+5:30

Crime News: तामिळनाडूमधील दलित नेते सी. पशुपती पांडियन यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या एका महिलेची डिंडीगुल येथे बुधवारी गळा कापून हत्या करण्यात आली.

Murder of a woman accused in a murder case, then cut her throat and put her head under a photo of a Dalit leader | हत्येच्या प्रकरणातील आरोपी महिलेचा केला खून, नंतर गळा कापून दलित नेत्याच्या फोटोखाली ठेवले डोके 

हत्येच्या प्रकरणातील आरोपी महिलेचा केला खून, नंतर गळा कापून दलित नेत्याच्या फोटोखाली ठेवले डोके 

googlenewsNext

चेन्नई - तामिळनाडूमधील दलित नेते सी. पशुपती पांडियन यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या एका महिलेची डिंडीगुल येथे बुधवारी गळा कापून हत्या करण्यात आली. तत्पूर्वी पांडियम यांच्या हत्येप्रकरणी आरोप असलेल्या चार जणांचीही हत्या झाली होती. दरम्यान, आता हत्या झालेल्या महिलेचे नाव निर्मला देवी आहे. तिचे वय ७० वर्षे इतके होते. दरम्यान, या महिलेची हत्या केल्यानंतर तिचा गळा कापून आरोपी तिचे शीर ननथावनपट्टी गावातील पांडियन याच्या घरी घेऊन गेले. तिथे ते पांडियन याच्या पोस्टरखाली ठेवण्यात आले. जिथे ही हत्या झाली ती जागा पांडियन याच्या घरापासून ५०० मीटर दूर आहे. पांडियन याची हत्या करणाऱ्यांना आश्रय दिल्याचा आरोप निर्मला देवी हिच्यावर होता.  (Murder of a woman accused in a murder case, then cut her throat and put her head under a photo of a Dalit leader)

निर्मला देवी हिच्या हत्येमागे पांडियनच्याच समर्थकांचा हात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यापूर्वीही एकूण चार आरोपींची हत्या करण्यात आली होती. त्यांची नावे पारा मडासामी, मुथुपंडी, बच्चा ऊर्फ मडासामी आणि सामी ऊर्फ अरुमुगासामा अशी होती. पांडियन देवेंद्रकुला वेल्लालर कुटामेपूचे संस्थापक आणि अध्यक्ष होते. त्यांची हत्या १० जानेवारी २०१२ रोजी झाली होती.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पोलिसांनी या प्रकरणी १८ जणांना आरोपी बनवले होते. या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी डिंडीगुलच्या स्पेशल कोर्टात सुरू होती. दरम्यान, बुधवारी निर्माला देवी गावाजवळ असलेल्या मनरेगा साईटवर पायी जात होती. त्यावेळी डेव्हिडनगरमध्ये दोघांनी तिचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांनी निर्मला देवीवर अनेक वार केले. अखेरीस ते तिचा गळा कापून घेऊन गेले. निर्मला देवीचे धड एका दुकानाबाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

त्यानंतर पोलिसांनी निर्मला देवीचे शीर आणि धड ऑटोप्सीसाठी डिंडीगुलच्या मेडिकल कॉलेजमध्ये नेले. जिल्ह्याचे डीआयजी बी. विजयकुमारी आणि एसपी व्हीआर श्रीनिवास यांनी घटनास्थळाचा दौरा करून लोकांकडे चौकशी केली. सूत्रांच्या मते आरोपी निर्मला देवी हिची हत्या करून पळत असताना सुमारे एक किलोमीटरवर त्यांचा अपघात झाला होता. त्यामुळे वाद झाल्याने आरोपी बाईक सोडून पळाले. नंतर पोलिसांना या बाईकच्या मालकाचा शोध घेतला असता त्याने या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याचे सांगितले.  

Read in English

Web Title: Murder of a woman accused in a murder case, then cut her throat and put her head under a photo of a Dalit leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.