एकतर्फी प्रेमाने घेतला डॉक्टर तरुणीचा जीव; मंगळवारी रात्रीपासून होती गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 08:56 AM2020-08-20T08:56:41+5:302020-08-20T10:06:51+5:30
डॉक्टर योगिता गौतम असे डॉक्टर तरुणीचे नाव आहे. एका महिलेचा मृतदेह सापडल्याचे समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाची ओळख पटविताना त्यांना ती योगिताच असल्याचे समजले.
आग्रा येथील सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस झालेल्या तरुण महिला डॉक्टरची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी या डॉक्टरचा मृतदेह शहरापासून दूर असलेल्य़ा डौकी ठाणे क्षेत्रातील बमरौली कटारामधील एका रिकाम्या भूखंडावर सापडला.
डॉक्टर योगिता गौतम असे डॉक्टर तरुणीचे नाव आहे. एका महिलेचा मृतदेह सापडल्याचे समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाची ओळख पटविताना त्यांना ती योगिताच असल्याचे समजले. योगिता ही दिल्लीला राहते. तिचे वडील, भाऊ देखील डॉक्टर आहेत. डॉ. योगिता ही मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता होती. तिचा फोनही बंद येत होता. यामुळे कुटुंबीयांचा तिच्याशी संपर्क होत नव्हता.
पोलिसांनी मृतदेह सापडल्य़ाचे तिच्या वडिलांना कळविले. यानंतर वडील आणि भाऊ आग्र्याला पोहोचले. त्यांनी आग्रा एमएम गेट पोलीस चौकीमध्ये मुलगी बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल केला. तिच्या वडिलांनी आरोप केला की, उरई मेडिकल कॉलेजचा मेडिकल ऑफिसर डॉ. विवेक तिवारी योगिताला प्रेमसंबंधांसाठी त्रास देत होता. तो योगिताला ठार मारण्याची धमकी देत होता. यानंतर पोलिसांनी योगिताचा मृतदेह सापडला त्या भागीतील सीसीटीव्ही फुटेज शोधले. यामुळे पोलिसांच्या हाती विवेकविरोधात पुरावे सापडले आहेत.
पोलिसांनी सायंकाळी विवेक तिवारीला ताब्यात घेतले असून पोस्टमार्टेम अहवालात योगिताच्या डोके आणि गळ्यावर जखमा आहेत. तसेच ती प्राण वाचविण्यासाठी झगडल्याचे म्हटले आहे. योगिताच्या सहकारी डॉक्टरांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. यामुळे काही काळ एसएन मेडिकल कॉलेजमधील रुग्णसेवाही प्रभावित झाली होती.
मुकेश अंबानी आता औषधे ऑनलाईन पुरविणार; Amazon ला धोबीपछाड, Netmeds खिशात
Gold Rates Today एका दिवसासाठीच चमकले! सोने पुन्हा घसरले; झटपट जाणून घ्या आजचा दर
जगाचा दुश्मन बनविले! बेलगाम शी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप; पक्षांतर्गत विरोध वाढता
पत्नीशी नाजूक संबंधांची शंका; सोनाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
बाबो! झोपलेल्या तरुणाच्या छातीवर येऊन बसली सिंहीण; पहा पुढे काय घडले?
वॉन्टेड! 2000 रुपये पगार पण चिनी कंपन्यांचा होता संचालक; ऐकून वडिलांना बसला धक्का