समलिंगी संबंध ठेवण्याच्या वादात तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 04:50 AM2018-11-06T04:50:33+5:302018-11-06T04:50:45+5:30
इन्स्टाग्रामवरून मैत्री झाल्यानंतर समलिंगी संबंध ठेवण्यावरून दोघांमध्ये झालेला वाद मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना रविवारी वांद्रे येथे घडली.
मुंबई : इन्स्टाग्रामवरून मैत्री झाल्यानंतर समलिंगी संबंध ठेवण्यावरून दोघांमध्ये झालेला वाद मिटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना रविवारी वांद्रे येथे घडली. पार्थ रावल (वय २५) असे मृताचे नाव असून पोलिसांनी या प्रकरणी धवल उनाडकट (२४) याला अटक केली आहे.
ब्लाऊज डिझायनरचे काम करणा-या महंमद कोमरंगची (२७) बोरीवलीत राहत असलेल्या धवल उनाडकटबरोबर इन्स्टाग्रामवरून मैत्री झाली. ‘गे’ असल्याने त्याने महंमदशी शारीरिक संबंध ठेवले. कोमरंगने त्याला एचआयव्ही चाचणी करण्यास सांगितले. मात्र उनाडकटने त्याला नकार दिल्यानंतर त्याच्याशी संपर्क तोडला. सोशल मीडियावरही कोमरंगने त्याला ब्लॉक केले होते. त्यामुळे रविवारी उनाडकटने त्याला खूश करण्यासाठी ‘आय लव्ह यु’ असा मेसेज टाकला. कोमरंग याने
त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे चिडून तो त्याच्या घरी
आला. तेथे दुबईवरून आलेला महंमदचा मित्र उपस्थित होता. त्या दोघांत ‘संबंध’ असावेत, या शंकेने उनाडकटने त्या दोघांबरोबर भांडण सुरू केले.
कोमरंगचा गळा त्याने लॅपटॉप चार्जरच्या वायरने आवळून मारहाण केली. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या रावलवर लाकडी मेणबत्तीच्या स्टँडने मारले. त्यामध्ये रावल गंभीर जखमी झाल्याने कोमरंगने त्याला खासगी रुग्णालयात नेले. मात्र
गंभीर दुखापत झाल्याने तिथल्या डॉक्टरने त्याला टाके घालण्यास
नकार दिला त्यामुळे त्याला
लीलावती रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी किरकोळ उपचार करून अॅडमिट करण्याचा सल्ला
डावलून दोघे जण त्याला घरी घेऊन आले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने थोड्या वेळातच त्याचा मृत्यू झाला.