वडिलांच्या वाढदिवसासाठी केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 06:02 PM2021-06-03T18:02:34+5:302021-06-03T18:06:25+5:30
Murder case : एका तरुणीवर असलेल्या प्रेमामुळे आरोपी आणि मृत तरुणामध्ये वाद होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
नवी दिल्ली - वडिलांच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. राजधानी दिल्लीत त्यामुळे खळबळ माजली आहे. दिल्लीमध्ये मंगळवारी १९ वर्षीय तरुणाची चौघांनी हत्या केली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. एका तरुणीवर असलेल्या प्रेमामुळे आरोपी आणि मृत तरुणामध्ये वाद होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
१९ वर्षीय कुणालच्या वडिलांचा मंगळवारी वाढदिवस होता. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी कुणालजवळच्या पेस्ट्री शॉपमध्ये चालला होता. दरम्यान चार आरोपींनी त्याला घेराव घालून चाकूने जीवघेणा हल्ला केला. दक्षिण दिल्लीतील आंबेडकर नगर परिसरात ही थरारक, धक्कादायक घटना घडली. हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हत्येप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणालच्या छातीत, पाठीत आणि पोटात चाकू भोकसण्यात आला. कुणालला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपींनी हत्येसाठी वापरलेल्या दोन चाकू ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरुन ऑर्डर करून मागवण्यात आले होत. चार आरोपींपैकी गौरव आणि कुणाल यांना एक तरुणी आवडत होती. त्यामुळे दोघांमध्ये वादंग निर्माण झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
वास्तू पुजनाच्या भोजनातून १०४ जणांना विषबाधाhttps://t.co/RdsRBLSqS9
— Lokmat (@MiLOKMAT) June 3, 2021