अकोटात क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 11:46 AM2020-05-29T11:46:49+5:302020-05-29T11:50:27+5:30

‘माझ्याकडे डोळे वटारून का बघतो’ या क्षुल्लक कारणावरून अकोट शहरातील एकाने दुसऱ्याची चाकूचे वार करून हत्या केली.

Murder of a youth for a Minor reason in Akot | अकोटात क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या

अकोटात क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या

googlenewsNext
ठळक मुद्देमुदासिर अली मुख्तार अली असे मृतकाचे नाव आहे.आरोपी अब्दुल शाहरुख अब्दुल राजिक याला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

- विजय शिंदे
अकोट: ‘माझ्याकडे डोळे वटारून का बघतो’ या क्षुल्लक कारणावरून अकोट शहरातील एकाने दुसऱ्याची चाकूचे वार करून हत्या केल्याची घटना २८ मे रोजी रात्री घडली. मुदासिर अली मुख्तार अली असे मृतकाचे नाव असून, पोलिसांनी आरोपी अब्दुल शाहरुख अब्दुल राजिक याला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील धारुळी वेस भागात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पोलिसांकडून प्राप्त माहितीनूसार, रमजान महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृतक मुदासिर अली मुख्तार अली याचा लहान भाऊ व आरोपी अब्दुल शहारुख अब्दुल राजिक यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर २८ मे रोजी रात्री धारोळी वेस या ठिकाणी पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले. ‘तु माझ्याकडे डोळे वटारून का बघतो’ असे म्हणत आरोपी अब्दुल शहारुख यांने आपल्या हातातील चाकुने मुदासिर अली याच्या छातीच्या डावे बाजूला सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन खाली पडलेल्या मुदासिर अली याला अकोट ग्रामीण रुग्णालय आकोट येथे नेले. तेथून त्याला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. सर्वोपचार रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची फिर्याद अकोट शहर पोलीस स्टेशनला मोबीन अली जामीन अली यांनी दाखल केली. पोलीसांनी आरोपी अब्दुल शहारुख अब्दुल राजिक रा. धारुळी वेस अकोट यांच्या विरूध्द भांदवी ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहीती दिली. आरोपीला रात्रीत अटक करण्यात आलीआहे. पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

 

Web Title: Murder of a youth for a Minor reason in Akot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.