अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो काढणाऱ्या तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 07:39 PM2018-11-27T19:39:05+5:302018-11-27T19:39:33+5:30

मुलीच्या पित्यासह दोघांना अटक, दीड महिन्यांनी लागला छडा

The murder of the youth who took porn photograph of a minor girl | अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो काढणाऱ्या तरुणाची हत्या

अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो काढणाऱ्या तरुणाची हत्या

Next

वसई - अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो काढल्याने संतप्त पित्याने सुहास धोंडे (वय ३८) या इसमाची हत्या केली आहे. तब्बल दीड महिन्यानंतर या हत्येचा छडा वसईच्या स्थानिक गुन्हे शाखेने लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन मुलींच्या पित्यासह दोन आरोपींना अटक केली आहे. 

मृत सुहास धोंडे हा वसईतील कोळीवाड्यात रहातो. १६ ऑक्टोबरपासून तो बेपत्ता होता. त्याचा मृतदेह मनोरच्या जंगलात आढळला होता. कुऱ्हाडीने त्याची हत्या करण्यात आली होती. एका खड्यात त्याचा मृतदेह टाकण्यात आला होता. मनोर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होता. मात्र, मयताची ओळख पटत नसल्याने या प्रकरणाचा तपास लांबला होता. वसईच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकऱणाचा तपास करण्यासाठी मृत तरुणाचे फोटो सर्व ठिकाणी लावले होते. ते फोटो मृत सुहास धोंडे यांच्या एका नातेवाईकाने ओळखले. त्याची ओळख पटल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांच्या पथकाने तपासाची सुत्रे वेगाने हलवली. मृत सुहास धोंडे यांच्या मोबाईलवरून त्यांच्या संपर्कात असलेली माणसांची चौकशी सुरू केली. या तपासानंतर पोलिसांनी वसई कोळीवाड्यात राहणारा आरिफ काझी (वय ४२) आणि विक्रमगड येथून अंकुश साने (वय ४५) या दोन्ही आरोपींना अटक केली. 

मृत सुहास धोंडे आणि आरोपी आरिफ काझी एकाच परिसरात राहतात. आरोपी आरिफच्या अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो मृत सुहास धोंडेने आपल्या मोबाईलमध्ये काढले होते. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्यामुळे त्यांने आपला सासरा अंकुश साने याच्या मदतीने हत्येचा कट  शिजवला. १६ ऑक्टोबर रोजी सुहासला झोपेच्या गोळ्या देऊन बेशुध्द केले आणि आपल्या गाडीतून मनोरच्या जंगलात नेले. तेथे हत्या करून मृतदेहाची विल्वेवाट लावली. 

Web Title: The murder of the youth who took porn photograph of a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.