विद्यार्थिनीची लैंगिक अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमास फाशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 06:28 PM2019-03-06T18:28:51+5:302019-03-06T18:30:31+5:30

अशोक मुकणे (३३) याला कल्याण जिल्हा न्यायालयाचे न्या. एन. एम. वाघमारे यांनी आजन्म कारावासासह फाशीची शिक्षा सुनावली.

The murderer is hanged by sexual exploitation of the girl | विद्यार्थिनीची लैंगिक अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमास फाशी

विद्यार्थिनीची लैंगिक अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमास फाशी

Next
ठळक मुद्दे ५ सप्टेंबर २०१३ च्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पीडित विद्यार्थिनी अंबरनाथ येथून आसनगाव स्थानकात उतरली.जवळपास कुणीच नसल्याचा गैरफायदा घेऊन तिला निर्जनस्थळी नेत तिचा मोबाइल काढून घेण्याचा तो प्रयत्न करत होता.तिने प्रतिकार केल्याने तिला बेदम मारहाण करत पाशवी अत्याचार केला.

कल्याण - १९ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या अशोक मुकणे (३३) याला कल्याण जिल्हा न्यायालयाचे न्या. एन. एम. वाघमारे यांनी आजन्म कारावासासह फाशीची शिक्षा सुनावली.

अट्टल बेवडा असलेला मुकणे सालगडी म्हणून काम करत होता. ५ सप्टेंबर २०१३ च्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पीडित विद्यार्थिनी अंबरनाथ येथून आसनगाव स्थानकात उतरली. येथून ती चालत घरी जात असताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मुकणे याने तिची वाट रोखली. जवळपास कुणीच नसल्याचा गैरफायदा घेऊन तिला निर्जनस्थळी नेत तिचा मोबाइल काढून घेण्याचा तो प्रयत्न करत होता. मात्र, तिने प्रतिकार केल्याने तिला बेदम मारहाण करत पाशवी अत्याचार केला. यानंतर जखमी अवस्थेतच तिची गळा दाबून हत्या करून पसार झाला. 

पोलीस उपअधीक्षक प्रशांत वाघुडे, पोलीस निरीक्षक सुनील वडके यांच्यासह उपनिरीक्षक मधुकर पवार, अकबर सय्यद, दिनेश निमगडे, एम. बी. ओवाळ, दिव्या पाटील, विलास शिंपी यांच्या पथकाने या प्रकरणाचा कसून तपास केला. तपास पथकाला पीडितेचा मोबाईल मुकणेकडे असल्याची माहिती मिळताच चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या मुकणेने गुन्हा कबुल केला. सरकारी वकील अश्विनी पाटील - भामरे यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावत असल्याचा निकाल न्यायालयाने दिला.

Web Title: The murderer is hanged by sexual exploitation of the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.