डोक्यात रॉड मारून दिघीत तरूणाचा खून ; अवघ्या काही तासात आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 14:37 IST2019-02-07T14:36:44+5:302019-02-07T14:37:35+5:30
नातेवाईक महिलेला त्रास दिल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरूणाची पानटपरीचालकाशी वादावादी झाली.

डोक्यात रॉड मारून दिघीत तरूणाचा खून ; अवघ्या काही तासात आरोपीला अटक
पिंपरी : नातेवाईक महिलेला त्रास दिल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरूणाची पानटपरीचालकाशी वादावादी झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. पानटपरी चालकाने जवळच पडलेला लोखंडी रॉड उचलून तरूणाच्या डोक्यात मारला. गंभीर जखमी झाल्याने तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दिघी मॅग्झिन चौकात घडली. युवक विक्रम वाघमारे (वय २२,रा.स्पाईन रस्ता, मोशी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. दिघी पोलिसांनी संतोष मनीराम चौधरी या आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या नातेवाईक महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून वाघमारे आणि चौधरी कुटूंबात चार पाच महिन्यांपासून वाद होता. याच कारणावरून आरोपी चौधरी आणि मृत्यू झालेल्या युवक वाघमारे याचे मंगळवारी दुपारी भांडण झाले. पानटपरी चालवित असलेल्या संतोष चौधरी या आरोपीने पानटपरीजवळ पडलेली लोखंडी सळई उचलुन युवकाच्या डोक्यात मारली. दुपारी तीनच्या सुमारास दिघी मॅग्झिन चौकात हा प्रकार घडला. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोघेही हमरीतुमरीवर आले. शिवीगाळ करीत एकमेकांच्या अंगावर धावून आले. या भांडणात आरोपी चौधरी याने जवळच पडलेला लोखंडी रॉड उचलून विक्रमच्या डोक्यात मारला. डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने रक्तबंबाळ होऊन विक्रम खाली कोसळला. त्यावेळी आरोपी तेथून पसार झाला होता. गजानन महाराज नगर येथून दिघी पोलिसांनी आरोपी संतोष चौधरी याला अटक केली आहे.