मुस्लीम तरुण साधूच्या वेशात पिस्तूल अन् चाकूसह मंदिरात घुसला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 02:21 PM2022-10-03T14:21:16+5:302022-10-03T14:22:11+5:30
आस मोहम्मद हे त्या तरुणाचं नाव
Muslim man enters Temple: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मुस्लीम तरुणाने साधूच्या वेशात मंदिरात प्रवेश केला. संशयिताकडून पिस्तूल, चाकू आणि ब्लेड जप्त करण्यात आली. गाझियाबादमधील ठाणे मसुरी भागातील एका गावात इकला मंदिरातून एक संशयित व्यक्तीला पकडण्यात आले. तरुणाकडून पिस्तूल, ब्लेड, चाकू व इतर आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या. महामंडलेश्वर प्रबुद्ध आनंद गिरी महाराज हे मंदिरात राहतात. त्यांनी अयोध्या आणि हरिद्वार येथील धर्मसंसदेचे अध्यक्षपदही भूषवले होते. ते येथे आल्यापासून त्यांच्या जीवाला जिहादींपासून धोका असल्याचे अनेकांचे मत आहे.
मंदिरात राहणाऱ्या साधूंचा आरोप
महामंडलेश्वर प्रबुद्ध आनंद गिरी महाराज यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा जीव घेण्यासाठी जिहादींनी कोट्यवधी रुपयांचे इनाम ठेवले आहे. प्रत्यक्षात अटक करण्यात आलेला तरुण आस मोहम्मद याने स्वत:ला समीर शर्मा बनवून मंदिर परिसरात प्रवेश केला. मात्र सुदैवाने मंदिरात काम करणाऱ्या सेवकांनी संन्याशाच्या वेशात मंदिरात घुसलेल्या आस मोहम्मदला कोणताही गुन्हा करण्याआधीच पकडले.
संशयित तरुणाकडून पिस्तूल जप्त
संशयित तरुण आस मोहम्मद याला पोलिसांनी गाझियाबादमध्ये पकडले. गाझियाबादच्या मसूरी पोलीस स्टेशन हद्दीतील इकला गावात असलेल्या महामंडलेश्वरांना मारण्यासाठी मंदिर परिसरात घुसलेल्या संशयिताची पोलीस चौकशी करत आहेत. आरोपींकडून पिस्तूल, चाकू, ब्लेडसह अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे.
सेवकांनी संशयित तरुणाला पकडले
गाझियाबादचे SP (ग्रामीण विभाग) म्हणाले की, इकला मंदिरातून एका संशयिताला चाकू, ब्लेड आणि पिस्तूलासह सेवकांनी पकडल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर चौकशी केली असता, तो या आधीही येथे आला असल्याची माहिती मिळाली. आरोपीची कसून चौकशी केली जाईल. यामागे आणखी कोण-कोण आहेत आणि त्यांचा हेतू काय, याचा शोध घेणे सुरू आहे.