"थंडीत कूलर लावतो, अंगावर थंड पाणी टाकतो"; हुंड्यासाठी पती झाला हैवान, करतो अमानुष छळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 12:58 PM2023-02-10T12:58:14+5:302023-02-10T13:03:05+5:30
पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठून पती आणि सासरच्या मंडळीकडून छळ होत असल्याचे पोलिसांना सांगितले.
हुंड्यासाठी एका महिलेचा छळ केल्याची घटना उत्तर प्रदेशातील बांदा येथून समोर आली आहे. पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठून लग्नानंतर पती आणि सासरच्या मंडळीकडून छळ होत असल्याचे पोलिसांना सांगितले. मारहाणीशिवाय तिच्यावर थंडीत पहाटे थंड पाणी टाकून कुलर, पंखे सुरू करून तिला त्रास दिला जात आहे. तसेच दिराने चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने पतीसह सासरच्या 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पीडित फातिमा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 24 मे 2021 रोजी बांदा येथील एका व्यक्तीसोबत मुस्लिम रितीरिवाजांनुसार तिचा विवाह झाला होता. घरी आल्यानंतर सासरचे लोक हुंड्याची मागणी करत होते. माझ्या वडिलांनी त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या. असे असतानाही त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत गेली असं पीडितेने म्हटलं आहे.
पती व सासरच्यांनी कुटुंबीयांना शिवीगाळ करत तुझ्या वडिलांनी पाच लाखांची सोन्याची चेन, बाईक दिली नाही, तू आता जा आणि पूर्ण हुंडा घेऊन परत घे, असे सांगितले. जर तुझ्या वडिलांनी हुंडा दिला नाही तर परत येऊ नकोस, आम्ही तुला ठेवणार नाही, दुसरा निकाह करू. याचदरम्यान वडिलांनी नातेवाइकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र काही उपयोग झाला नाही.
याप्रकरणी एसएचओ श्यामबाबू शुक्ला यांनी सांगितले की, एका महिलेने तिच्या सासरच्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तक्रार मिळाल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चर्चा सुरू आहे, जे काही पुरावे आणि तथ्य समोर येईल, त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, आरोपींना सोडले जाणार नाही. एका हिंदी वेबसाईने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"